...त्यामुळे माझे गुप्तांग सरकले,भाजप खासदाराची जीभ घसरली

विशेष म्हणजे खासदार बनसोडे यांच्या जन्मगावातच हा प्रकार पहायला मिळालाय.

सागर सुरवसे, सोलापूर, 29 आॅगस्ट : ऊठसूठ संस्कृती आणि सभ्यतेच्या गोष्टी करणाऱ्या भाजपच्या खासदारांनी एका सार्वजनिक व्यासपीठावर स्वतः सहित पक्षाची अब्रू अक्षरशः वेशीवर टांगल्याचा प्रकार पहायला मिळाला.. यावेळी भाजप खासदार शरद बनसोडे यांनी सभा संकेत सोडून स्वानुभवाचे प्रसंग सांगताना समोर बसलेल्या महिला आणि ज्येष्ठांचा विचार न करता गुप्तांगाबाबतचा किस्सा सांगून स्वतःचे हसू करुन घेतले. विशेष म्हणजे खासदार बनसोडे यांच्या जन्मगावातच हा प्रकार पहायला मिळालाय. या किस्स्यानंतर गावातील नागरिक आणि महिलांनी खासदारांचे भाषण थांबवले. निमित्त होते पानमंगरुळ गावातील डॉ. अशोक हिप्परगी यांच्या एकसष्टीचे. नेमकं काय म्हणाले शरद बनसोडे ?

विशेष म्हणजे व्यासपीठावर माजी खासदार सुशीलकुमार शिंदे उपस्थित होते. त्यांच्या देखत खासदार बनसोडेंनी अकलेचे तारे तोडले. खासदार शरद बनसोडे यांच्या या किस्स्यानंतर कार्यक्रमात एकच स्मशानशांतता पसरली. समोर महिला पदाधिकाऱ्या बसलेल्या होत्या.अखेर विद्यमान कॉंग्रेस आमदारांनी माईकचा ताबा घेतला आणि शरद बनसोडे यांची बोलती बंद केली. गावकऱ्यांना खासदार साहेबांच्या प्रतापाचा तीव्र संताप व्यक्त करत कार्यक्रम बंद पाडला.

Trending Now