माओवादी 'थिंक टँक' अटक प्रकरणी मानवाधिकार आयोगाची महाराष्ट्र पोलिसांना नोटीस

एल्गार परिषदेच्या संदर्भात पाच जणांना केलेल्या अटकेसंदर्भात राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने स्वत:हून याची दखल घेतली.

पुणे, 29 आॅगस्ट :  माओवादी कनेक्शनच्या संशयावरून 5 जणांना अटक केल्या प्रकरणी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं महाराष्ट्र पोलिसांना नोटीस बजावलीये. पोलिसांनी या अटकसत्रादरम्यान निर्धारित कार्यपद्धतीचं आणि नियमांचं योग्य पालन केलं नसल्याचं आयोगानं या नोटीसीत म्हटलंय. या प्रकरणी चार आठवड्यात उत्तर देण्याचे आदेश मानवाधिकार आयोगानं राज्य सरकारला दिले आहे.माओवाद्यांशी संबंध असल्याच्या संशयातून पुणे पोलिसांनी काल देशात ठिकठिकाणी छापे मारून वरवरराव, अरूण परेरा, वर्णन गोन्सॅल्विस, सुधा भारद्वाज, गौतम नवलाखा या पाच जणांना अटक केली. पुण्यात 31 डिसेंबर 2017ला शनिवारवाड्यावर झालेल्या एल्गार परिषदेसाठी माओवाद्यांनी पैसा पुरवल्याचा आरोप या पाचही जणांवर आहे.पुणे पोलिसांनी एल्गार परिषदेच्या संदर्भात पाच जणांना केलेल्या अटकेसंदर्भात राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने स्वत:हून याची दखल घेतली आणि आज महाराष्ट्र सरकारला नोटीस बजावली.

दरम्यान, शहरी नक्षल कनेक्शन प्रकरणी अटक करण्यात आलेल्या पाच जणांपैकी तिघांना आज पुणे कोर्टात हजर केलंय. तर इतर दोघांची ट्रांझिक रिमांड मिळाल्यानंतर त्यांना पुण्यात आणलं जाईल. मंगळवारी पुणे पोलिसांनी मुंबई, हैदराबाद, ठाण्यासह इतर दोन ठिकाणी छापे टाकले होते.त्यात तेलुगू विद्रोही कवी वरवरा राव, अरूण परेरा आणि वर्णन गोन्सॅल्विस या तिघांना अटक करण्यात आलीय. पुण्यात 31 डिसेंबर 2017ला शनिवारवाड्यावर झालेल्या एल्गार परिषदेसाठी माओवाद्यांनी पैसा पुरवल्याचा आरोप आहे. दरम्यान, या अटकसत्राविरोधात हैदराबादमध्ये निदर्शनं झाली. प्रकाश आंबेडकर यांनीही या कारवाईविरोधात टीकेची झोड उठवली आहे.पुणे पोलिसांनी एल्गार परिषदेचे आयोजक सुधीर ढवळे, वकील सुरेंद्र गडलिंग, महेश राऊत, रॉना विल्सन आणि प्राध्यापक शोमा सेन यांना अटक केली होती. या चौघांच्या 200 ईमेलची तपासणी केली असता पुणे पोलिसांना अन्य काही जणांसंदर्भात महत्त्वाची माहिती मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी छापेमारी करत 5 जणांना अटक केली. अटक केलेल्या आरोपींकडून माओवादयासंदर्भातले कागदपत्र मिळाले असल्याची माहिती मिळतंय.VIDEO : तरुणाच्या हत्येची थरारक घटना सीसीटीव्हीत कैद

Trending Now