VIDEO: 3 शहरं 3 रिपोर्टर, ही आहे 'BharatBandh'ची स्थिती

10 सप्टेंबर : गेल्या 16 ते 17 दिवसांपासून देशाची जनता इंधन दरवाढीची झळ सोसतेय आणि याच इंधन दरवाढीविरोधात आज भारत बंदची हाक देण्यात आली आहे. काँग्रेसनं पुकारलेल्या भारत बंदला राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, शेकाप, डावे पक्ष, बसपा आणि पीपल रिपब्लिकन पक्षानं पाठिंबा दर्शवला आहे. तर शिवसेना आजच्या बंदमध्ये सामील होणार नाहीये. मुंबईतही आता बंदचे पडसाद उमटताना दिसत आहेत. तर पुण्यात भारत बंद आंदोलनाला सुरुवात झाली असून कुमठेकर रस्त्यावर मनसे कार्यकर्त्यांनी बसची तोडफोड केली. नाशिकमध्ये मनसेने पंचवटी बस डेपोमध्ये आंदोलन सुरू केलंय. शहर वाहतूक विभागाच्या बस मनसैनिकांनी अडवल्या आहेत. बंदच्या पार्श्वभूमीवर बस डेपो परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त दिसून येत आहे.

Your browser doesn't support HTML5 video.

Trending Now