गावाकडचे गणपती : लिंबासूरापासून मुक्ती देणारा बीड जिल्ह्यातला 'लिंबागणेश'

गणेश चतुर्थीला चंद्राचं दर्शन घेऊन उपवास सोडण्याचं महात्म्य ज्या ठिकाणाला लाभतं ते ठिकाण म्हणजे बीड जिल्ह्यातलं लिंबागणेश अशी भाविकांची श्रद्धा आहे.

शशी केवडकर,प्रतिनिधी,बीड,ता.11 सप्टेंबर : गणेश चतुर्थीला चंद्राचं दर्शन घेऊन उपवास सोडण्याचं महात्म्य ज्या ठिकाणाला लाभतं ते ठिकाण म्हणजे बीड जिल्ह्यातलं लिंबागणेश अशी भाविकांची श्रद्धा आहे. गणपतीने चंद्राला शाप दिला मात्र इतर देवतांच्या विनंतीवरून त्याची शापातून मुक्तता देखील केली, हे करताना चंद्राला बारा वर्ष तपश्चर्या करावी लागली तेही हेच ठिकाण आहे.नांदेड-पुणे या राज्य महामार्गावर एका वेगळ्याच नावाचं गाव तुम्हाला लागतं, त्या गावाचं नाव आहे लिंबागणेश. अंदाजे साडेचार हजार लोकवस्तीचं हे गाव आहे. गावातले बहुसंख्य गावकरी हे शेतकरी आणि वारकरी संप्रदायाला मानणारे. एके काळी दंडकारण्याचा भाग असलेला हा परिसर लिंबासूरच्या आधिपत्याखाली होता असं मानलं जातं.या गावाचं वैशिष्ट्य म्हणजे गावाच्या दक्षिणेकडून गंगा वाहते. लिंबा नावाच्या भक्ताने भगवान शंकराची तपस्या करून वर प्राप्त केला. पण मिळालेल्या आशीर्वादाचा दुरूपयोग केल्यानं गणपतीने या लिबांसूराचा अंत याच ठिकाणी केला अशी दंतकथा सांगितली जाते. एवढाच नाही तर चंद्राला उप:शाप मिळाला ते ठिकाणही हेच. अशी पौराणिक कथा देखील सांगितली जाते.

वर्षभरात या देवस्थानात विविध उत्सव आयोजित केले जातात. यात गणेशोत्सव हा सगळ्यात मोठा आणि वेगळा असतो. या शिवाय वर्षभरातले इतर सण-समारंभ इथे मोठ्या प्रमाणात होत असतात.भक्तांच्या हाकेला धावणारा हा गणपती भालचंद्र या नावाने राज्यभर प्रसिद्ध आहे. महामार्गावर असल्यानं या ठिकाणी भाविकांचा ओघ हा कायम सुरूच असतो.या गावात गणेशोत्सवाच्या निमित्ताने मागील अडीचशे - तीनशे वर्षाची एक अनोखी परंपरा आहे. परिसरातील १४-१५ गाव-तांडा वस्तीत फक्त एकच गणपती बसविण्यात येतो. हा गणपती देखील पिढ्यानपिढ्या एकाच कुटुंबात असतो. 

Trending Now