पुलावरून गळफास घेऊन एपीआयची आत्महत्या; घरात सापडली 2 लाखांची रोकड

राजमाने यांनी रविवारी रात्री पोलीस पेट्रोल पंपावरील पाच लाखाची रोकड लुटली होती. या प्रकरणी फिर्यादी म्हणून राजमाने यांची तक्रार करण्यात आली होती.

Renuka Dhaybar
सोलापुर, 21 मार्च : सोलापुरामध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे. एपीआय मारुती राजमाने यांनी जुना तुळजापूर नाक्यावरील पुलाला लटकून आत्महत्या केली आहे. मारुती राजमानेंवर पेट्रोलपंप लुटल्याचा आरोप आहे. त्यासंबंधी त्यांच्या घरी पोलीस छाप्यात 2 लाखांची रोकडही सापडली होती. दरम्यान आपली चोरी पकडली गेल्याने राजमाने यांनी आत्महत्या केली असल्याचं बोललं जात आहे.पेट्रोल पंप लूट प्रकरणी राजमाने हेच फिर्यादी होते राजमाने यांच्या घरी 2 लाखांची रोकड सापडली होती. पण या तपासादरम्यानच राजमाने यांनी आत्महत्या केली आहे. त्यांनी पुलावरून गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.राजमाने यांनी रविवारी रात्री पोलीस पेट्रोल पंपावरील पाच लाखाची रोकड लुटली होती. या प्रकरणी फिर्यादी म्हणून राजमाने यांची तक्रार करण्यात आली होती.

 

Trending Now