4 व्यापाऱ्यांनी तुळजाभवानीला वाहिला 26 तोळे सोन्याचा हार!

महाराष्टची कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीला सोलापूरच्या भक्तांनी २६ तोळे सोन्याचा हार प्रक्षाळ पुजेपूर्वी अर्पण केला आहे.

उस्मानाबाद, 26 ऑगस्ट : महाराष्टची कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीला सोलापूरच्या भक्तांनी २६ तोळे सोन्याचा हार प्रक्षाळ पुजेपूर्वी अर्पण केला आहे. गुरूवारी रात्री हा अर्पन करण्यात आला आहे. संस्थानचे व्यवस्थापक तहसिलदार राहूल पाटील यांच्याकडे हार सुपूर्द करण्यात आला असून त्याची मंदिराच्या अभिलेखामध्ये रीतसर नोंद घेण्यात आली आहे.पाळीचे पुजारी वीरेंद्र कदम यांनी पूजा करून देवीस हार अर्पण केला. हे दान देणारे पाच व्यक्ती सोलापूरचे व्यापारी आहेत. देवीला सोन्याचा हार अर्पण केला असला तरी आमची नावे प्रसिध्द केली जावू नयेत, अशी विनंती त्यांनी केली आहे.प्रशासनाने ही त्यांचा विनंतीला मान देत हार देणाऱ्या भाविकांची नावे गुप्त ठेवण्यात आली आहेत. दरम्यान प्रशासनाच्यावतीने त्यांना देवीची प्रतिमा देवून सत्कार करण्यात आला आहे.

 PHOTOS : उदयनराजेंचा नादखुळा, शहरात चालवला कचऱ्याचा डंपर !

Trending Now