VIDEO : अखेर धरणात अडकलेल्या 20 माकडांची झाली सुटका!

दारव्हा, 19 ऑगस्ट : महागांव कसबा येथील लघुसिंचन प्रकल्पात तब्बल तीन दिवसांपासून अडकलेल्या 20 माकांडाना चंद्रशेखर आझाद क्रिडा मंडळाच्या युवकांनी आणि वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी जीवदान दिल्याने ग्रामस्थांनी सुटकेचा श्वास टाकला असून युवकांचे कौतुक होत आहे. दारव्हा तालुक्यातील महागांव लघुसिंचन प्रकल्पातील पाण्याची पातळी वाढल्याने प्रकल्पातील एका बाभळीच्या झाडावर जवळपास 20 माकडे अडकून पडल्याने त्यांचा जीव टांगणीला लागला होता.

Your browser doesn't support HTML5 video.

दारव्हा, 19 ऑगस्ट : महागांव कसबा येथील लघुसिंचन प्रकल्पात तब्बल तीन दिवसांपासून अडकलेल्या 20 माकांडाना चंद्रशेखर आझाद क्रिडा मंडळाच्या युवकांनी आणि वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी जीवदान दिल्याने ग्रामस्थांनी सुटकेचा श्वास टाकला असून युवकांचे कौतुक होत आहे. दारव्हा तालुक्यातील महागांव लघुसिंचन प्रकल्पातील पाण्याची पातळी वाढल्याने प्रकल्पातील एका बाभळीच्या झाडावर जवळपास 20 माकडे अडकून पडल्याने त्यांचा जीव टांगणीला लागला होता. महागांव येथील लघुसिंचन प्रकल्पाचे काम हे यावर्षीच पूर्ण झालं असून, प्रथमच त्यात पाणी अडविण्यात आलंय. 16 ऑगस्ट रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे प्रकल्पातील पाण्याची पातळी वाढली. दारव्हा-आर्णी मार्गावरील प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात एका बाभळीच्या झाडावर जवळपास 20 माकडं अडकून पडली होती. चहु बाजूंनी पाणी असल्याने त्यांना खाली उतरता आले नाही. तीन दिवसांपासून उपाशी असल्याने त्यांचा जीव कासावीस झाला होता. ही बाब महागांव येथील सामाजिक कार्यकर्ते राजेश चव्हाण यांच्या लक्षात आली. त्यांनी दारव्हा विभागाचे वनक्षेत्र अधिकारी चेतन नेहारे यांना याबाबत माहिती दिली. नेहारे यांच्या मार्गदर्शनात आज वनविभाग आणि चंद्रशेखर आझाद क्रीडा मंडळाच्या युवकांची एक टीम तयार करण्यात आली. प्रथम या टिमने त्या माकडांना खाद्य पुरवले आणि त्यानंतर त्यांना सुरक्षीत बाहेर काढले.

Trending Now