JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / मोठी बातमी! राष्ट्रवादीमध्ये पुन्हा हालचालींना वेग, अजितदादांनी सर्व आमदार, जिल्हाध्यक्षांना तातडीनं मुंबईत बोलावलं

मोठी बातमी! राष्ट्रवादीमध्ये पुन्हा हालचालींना वेग, अजितदादांनी सर्व आमदार, जिल्हाध्यक्षांना तातडीनं मुंबईत बोलावलं

राष्ट्रवादीमध्ये पुन्हा हालचालींना वेग आला आहे. अजित पवार यांनी राज्यातील सर्व आमदार आणि जिल्हाध्यक्षांना मुंबईत बोलावलं आहे.

जाहिरात

अजित पवार

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 2 जुलै, विनोद राठोड :  मला विरोधी पक्षनेते पदात रस नाही, संघटनात्मक जबाबदारी देण्यात यावी असं वक्तव्य काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केलं होतं. त्यानंतर अजित पवार यांना प्रदेशाध्यक्षपद हवं असल्याची चर्चा सुरू झाली. आता राष्ट्रवादीमध्ये मोठ्या फेरबदलाचे संकेत मिळत आहेत. येत्या सहा जुलै रोजी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यातील प्रमुख नेत्यांची बैठक बोलावली आहे. याच बैठकीमध्ये अजित पवार यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपद देण्याचा निर्णय होऊ शकतो अशी माहिती समोर येत आहे. अजित पवार यांच्या मागणीवर प्रतिक्रिया देताना शरद पवार यांनी म्हटलं होतं की, पक्षात मी एकटा निर्णय घेत नाही. पक्षातील नेत्यांसोबत चर्चा करून अजित पवारांच्या मागणीवर निर्णय घेऊ. त्यानंतर  शरद पवार यांनी आता सहा जुलै रोजी राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक बोलावली आहे. त्यामुळे याच बैठकीत प्रदेशाध्यक्ष बदलण्याचा निर्णय होऊ शकतो अशी शक्यता आहे.

अजित पवारांनी बोलावली बैठक दरम्यान दुसरीकडे आज अजित पवार यांनी राज्यातील सर्व आमदार आणि जिल्हाध्यक्षांना मुंबईत बोलावलं आहे. आमदार आणि जिल्हाध्यक्षांसोबत अजित पवार हे आज बैठक घेणार आहे. या बैठकीला सुरुवात झाली आहे. ही बैठक अजित पवार यांच्या निवासस्थानी पार पडत आहे. या बैठकीमध्ये आगामी पावसाळी अधिवेशन आणि प्रदेशाध्यक्ष बदलाबाबत चर्चा होणार असल्याची माहिती समोर येत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या