मराठी बातम्या / बातम्या / महाराष्ट्र / गाडी समोर आले अन् 1 कोटी घेऊन गेले, सांगलीत द्राक्ष व्यापाऱ्याला लुटलं

गाडी समोर आले अन् 1 कोटी घेऊन गेले, सांगलीत द्राक्ष व्यापाऱ्याला लुटलं

द्राक्ष व्यापाऱ्याला एक कोटींना लुटलं

सांगलीच्या तासगाव मध्ये एका द्राक्ष दलाल व्यापाऱ्यास एक कोटी रुपयांना लुटण्यात आल्याचा प्रकार घडला आहे.


आसिफ मुरसळ, प्रतिनिधी

सांगली, 28 मार्च : सांगलीच्या तासगाव मध्ये एका द्राक्ष दलाल व्यापाऱ्यास लुटण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. या व्यापाऱ्याकडून सुमारे 1 कोटी 10 लाख रुपयांना लुटलं आहे. तासगावच्या दत्तमाळ येथील गणेश कॉलनी येथे हा प्रकार घडला आहे. महेश केवलानी या व्यापाऱ्याला चोरट्यांनी लुटलं आहे. महेश केवलानी हे मूळचे नाशिकचे राहणारे असून तासगावमध्ये व्यापारासाठी आले होते.

तासगावच्या दत्तमाळ येथील गणेश कॉलनी येथे हा प्रकार घडला आहे. महेश केवलानी हे द्राक्ष व्यापारी असून तासगाव तालुक्यातील द्राक्ष शेतकऱ्यांकडून द्राक्ष घेऊन ते विक्री करतात. केवलानी यांनी खरेदी केलेल्या द्राक्षाचे पैसे देण्यासाठी मंगळवारी सांगलीतून आपल्या स्कॉर्पिओ गाडीतून एक कोटी 10 लाख रुपयांची रक्कम एका बॅगेत भरून तासगावला येत होते. ते राहत असलेल्या गणेश कॉलनी येथे पोहचले असता,अचानक सहा ते सात जणांनी केवलानी यांची स्कार्पिओ गाडी अडवली आणि यावेळी गाडीतील चालक आणि केवलानी यांच्यासह त्यांच्या सोबत असणाऱ्या कामगाराला मारहाण सुरू केली. यामध्ये खाली पडल्याने त्यांना डोक्याला मार लागला, या दरम्यान हल्लेखोरांनी गाडीत असणारी एक कोटी दहा लाख रुपये रकमेची बॅग लंपास करत घटनास्थळावरून पोबारा केला.

तुमच्या शहरातून (सांगली)

Sangli News: महाराष्ट्रातील 'या' गावात दीड तास टीव्ही, मोबाईल बंद, कारण ऐकून कराल कौतुक, Video

Sangli News: इथं रोज सकाळी सायरन वाजतो अन् 52 सेकंद अख्ख गाव स्तब्ध उभं राहतं! SPECIAL REPORT

Sangli News : उन्हाळ्यात महागाईचा चटका, कडधान्याचे दर कडाडले, पुढील काही महिने..... Video

Sangli News : काही मिनिटांत रिलायन्सच्या शोरूममधील दागिने गायब, काय घडलं पाहा Photo

Sangli News: महाराष्ट्रातील या जिल्ह्यात आहेत ऐतिहासिक 55 विहिरी, कुठे? पाहा हा VIDEO

Sangli News : 'त्या' वस्तूनं तरुणाचा घात केला; संतापच्या भरात भावजयीनेच दिराला संपवलं

Sangli News: जिथं पाणी मिळणं कठीण झालं तिथं विद्यार्थ्यांनी वाचवली वनराई! गावाचं पालटलं रुप, Video

Sangli News: ज्यांचं कुणी नाही त्यांना इथं मिळतोय आधार, महाराष्ट्रातलं एक हक्काचं घर VIDEO

Sangli News : सांगलीच्या मंगल कार्यालयात आक्रोश, लग्नानंतर भयानक घडलं, वाढप्याचा मृत्यू, सहा जखमी

Sangli News : महाराष्ट्रातलं असं गाव जिथे घराघरात आहे बुलेट, काय आहे नेमकं कारण?

Sangli News : पत्नीला हॉस्पीटलमध्ये पाहिलं ते शेवटचं, तीन जीवलग मित्रांच्या कारला अपघात, पुढे जे घडलं ते

घटनास्थळी तासगाव पोलिसांनी धाव घेत पंचनामा करत तपास सुरू केला, तर सदर घटनेची माहिती मिळताचं पोलीस अधीक्षक बसवराज तेली हे देखील घटनास्थळी दाखल झाले होते. तेली यांनी व्यापारी महेश केवलानी यांच्याकडून घटनेची माहिती घेत, लुटारूंच्या शोध घेण्यासाठी तीन ते चार पथके पोलिसांच्या कडून तैनात केली आहेत. त्याच बरोबर जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी पोलिसांकडून नाकाबंदी करण्यात आली.

या घटनेमध्ये हल्लेखोरांनी महेश केवलानी यांच्यावर पाळत ठेवून त्यांचं पाठलाग करत त्यांना लुटले असून प्लॅनिंग करून हा कट रचल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांच्याकडून व्यक्त करण्यात आला आहे.

First published: March 28, 2023, 23:13 IST
top videos
  • Ulhasnagar News : उल्हासनगरच्या मार्केटमध्ये चांगलं फर्निचर कसं ओळखायचं? ‘हा’ Video पाहाच
  • Thane News : मुंबईच्या पावसात भिजत ॲाफिसला जायचं? नाही ना, इथं मिळेल स्वस्तात मस्त छत्री-रेनकोट VIDEO
  • Chhatrapati Sambhaji Nagar News : शेतकऱ्यांनो, मान्सूनपूर्व कापसाची लागवड करताय? ‘हा’ आहे धोका, पाहा Video
  • Pune News : राजा-सोन्याच्या बैल जोडीला संत तुकाराम महाराजांच्या पालखीसाठी मान, पाहा कशी मिळाली संधी Video
  • Solapur News : शेतकऱ्यानंचं तयार केलं फळबागांसाठी खास यंत्र, कमी पैशात मिळणार मोठा फायदा, Video
  • ताज्या बातम्या

    सुपरहिट बॉक्स