मुंबई, 27 मार्च : राज्यात हळूहळू उन्हाचा चटका वाढू लागला आहे. मात्र तरी देखील अद्यापही पावसाचं सावट आहे. विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया व गडचिरोली या जिल्ह्यात 30 मार्चपर्यंत ढगाळ वातावरण राहणार असून, तुरळक पावसाची शक्यता हवामान तज्ज्ञांकडून वर्तवण्यात आली आहे. विदर्भ वगळता राज्यातील इतर भागात वातावरण कोरडे राहणार असून, कमाल तापमानात तीन ते चार अंश सेलल्सिअसने वाढ होण्याची शक्यता आहे.
विदर्भावर पावसाचं सावट
राज्यात पावसामुळे रब्बी पिकाला मोठा फटका बसला आहे. गारपीट आणि पावसामुळे ज्वारी, गहू, हरबारा या पिकांचं तसेच आंबा, केळी, द्राक्ष बागांचं मोठं नुकसान झालं आहे. ऐन हातातोंडाशी आलेला घास हिरवला गेल्यानं बळीराजा हवालदिल झाला आहे. अशातच शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी समोर येत आहे. ती म्हणजे विदर्भ वगळता राज्यातील इतर भागात आता पावसाची शक्यता नाही. मात्र विदर्भात तीस मार्चपर्यंत हवामान ढगाळ राहून पाऊस पडण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांकडून वर्तवण्यात येत आहे. तर उर्वरीत महाराष्ट्रात उन्हाचा तडाका वाढण्याची शक्यता आहे. कमाल तापमान तीन ते चार अंश सेलल्सिअसने वाढण्याची शक्यता आहे.
Mumbai University: नावावर तब्बल 7 पेटंट, 80हून अधिक इंटरनॅशनल रिसर्च पेपर्स; 'हे' आहेत मुंबई विद्यापीठाचे नवे कुलगुरू
World Poha Day : इंदुरचे प्रसिद्ध पोहे मुंबईत खायचे आहेत? 'या' ठिकाणी संपेल तुमचा शोध, पाहा Video
Mission Admission: 11वीमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खूशखबर; मार्गदर्शन केंद्रं झाली सुरु; इथे मिळेल माहिती
lalbag ganpati 2023: लालबाग राजाच्या मूर्तीचे पाऊल पूजन संकष्टीला संपन्न; मूर्तीच्या बांधणी सुरुवात
Army Success Story: 'वर येऊ नका, मी यांना बघून घेईन'; 26/11च्या वेळी दहशतवाद्यांचा खात्मा करणारा योद्धा; कोण होते मेजर संदीप उन्नीकृष्णन
Mumbai News : Rasika Sunil करणार Diet लग्न, मुहूर्तही ठरला! पाहा काय आहे प्रकार Video
Kandivali crime : पत्नीशी अनैतिसंबंध असल्याचा लागला सुगावा; तरुणाचे मित्रासोबत धक्कादायक कृत्य
Mumbai News : चेंबूरमध्ये बांधकाम सुरू असताना क्रेन कोसळली, 5 जण जखमी, घटनास्थळाचे PHOTOS
Mumbai hostel Crime : मुंबई बलात्कार आणि हत्या प्रकरणात धक्कादायक गोष्टी समोर; तरुणीची रुममेट..
हातावर अनेक वार, रक्तबंबाळ अवस्था; महिला पोलिसाने वाचवला तरुणीचा जीव
Mumbai News : चर्चगेटला वसतिगृहातील तरुणीचा खून हा धक्कादायक प्रकार : चित्रा वाघ
उन्हाचा कडाका वाढणार
मार्च संपत आला आहे. मात्र मार्च महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे उन्हाच्या झळा म्हणाव्या इतक्या जाणवल्या नाहीत. मात्र आता पावसाचं सावट सरल असून, तापमानात तीन ते चार अंश सेलल्सिअसने वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यात उन्हाचा कडाका वाढू शकतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.