मुंबई, 10 मार्च: गोव्यात (Goa Election Results 2022) यंदा गेल्या वेळसारखीच परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता Exit Polls मध्ये वर्तवण्यात आली आहे. या राज्यात त्रिशंकू स्थिती निर्माण होण्याची चर्चा असल्याने निकालानंतर आमदारांची पळवापळवी होऊ शकते. काँग्रेस आणि भाजप (गोवा विधानसभा निवडणुक निकाल ) या मुख्य पक्षांमध्ये असलेली लढत चुरशीची होणार हे निश्चित. म्हणूनच या छोट्या राज्याच्या निवडणुकीवर देशाचं लक्ष आहे.
गोवा विधानसभा (Assembly Election 2022) ही देशातल्या सर्वांत छोट्या विधानसभांपैकी एक. मोजून 40 जागा असलेली ही विधानसभा तरीही साऱ्या देशाचं लक्ष वेधून घेत आहे. 40 पैकी 21 हा बहुमताचा आकडा कोण गाठतो हे महत्त्वाचं आहे, तसं त्या आकड्याच्या जवळपास पोहोचणारे कोण आहेत हेही औत्सुक्याचं आहे. महाराष्ट्राचा हा सख्खा शेजारी असल्याने आणि सांस्कृतिकदृष्ट्या जवळीक मोठी असल्याने महाराष्ट्राचं तर अधिक लक्ष या निवडणुकीकडे आहे.
संतापजनक! मुंबईत कोरियन मुलीच्या छेडछाडीनंतर गोव्यात विदेशी महिलेसोबत थेट..
मुंबईतून गोवा, कोकणात जाणाऱ्यांसाठी मोठी बातमी, लवकरच वाहतूक कोंडी संपणार
Goa Politics : काँग्रेस सोडलेले गोव्याचे 7 आमदार अमित शहांच्या भेटीला, मोठ गिफ्ट मिळणार?
Goa Tourism : गोवा फिरण्यासाठी जातायेत? 'या' ठिकाणी होईल मोफत राहण्याची सोय
मुलीनं केली कमाल! मायक्रोसॉफ्टनं दिलं बंपर पॅकेज; 8-10 लाख नव्हे सॅलरीचा आकडा बघून व्हाल थक्क
गोव्यात पुन्हा एकदा धक्कादायक घटना, रिसॉर्टमध्ये डच महिलेसोबत भयंकर घडलं
घरात न सांगता व्हॅलेटाईन साजरा करण्यासाठी प्रेमी युगुल गोव्याला गेलं अन् परत आलेच नाहीत
आता गोव्यात 'काय हाटील, काय डोंगर'चं सत्र सुरू! काँग्रेस आमदारांना चेन्नईला हलवलं
पोटात गर्भ वाढत असताना पतीने थेट पत्नीवर घातल्या गोळ्या…, कारण ऐकून बसेल धक्का
Airplane Emergency Landing : गोवा-हैदराबाद विमानात अचानक धुराचे लोट; Emergency लँडिंग, धक्कादायक VIDEO
गोव्यातील कर्ली क्लब पाडण्यास सुरुवात; याच क्लबमधील पार्टीनंतर झालेला सोनाली फोगटचा मृत्यू
मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. या नेत्याचं राजकीय भवितव्य या निवडणुकीवर अवलंबून असल्याचं बोललं जातं. विशेष म्हणजे आम आदमी पक्ष, तृणमूल काँग्रेस, महाराष्ट्रवादी गोमंतक पार्टी या सगळ्याच पक्षांमध्ये कोण किती जागा जिंकणार याची स्पर्धा आहे. हे छोटे पक्ष किंग मेकरची भूमिका निभावू शकतात.
2017 साली गोव्यात काँग्रेसने 40 पैकी 17 जागा जिंकल्या आणि तीन जागा जिंकलेल्या गोवा फॉरवर्ड पार्टीसह अनौपचारिक आघाडीही केली होती; मात्र केवळ 13 जागा जिंकलेल्या भाजपने राजकीय खटपटी करून सरकार स्थापन करण्यात यश प्राप्त केलं होतं. पर्रिकर केंद्रातून पुन्हा राज्यात आले आणि मुख्यमंत्री झाले.
हे वाचा - Goa Election: निकालाआधीच धास्तावली काँग्रेस, घोडेबाजार टाळण्यासाठी उमेदवारांना करणार हॉटेलात बंद
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags:Assembly Election, Goa