मुंबई, 10 मार्च : उत्तरप्रदेशसह (UP Election) एकूण पाच राज्यांच्या निवडणुकांचे निकाल (5 state assembly election result) हाती येऊ लागले आहेत. या निवडणुकीत पाच पैकी चार राज्यांत भाजपने जवळपास स्पष्ट बहुमत मिळवलं आहे. केवळ पंजाबमध्ये भाजपला (BJP) पराभवाचा सामना करावा लागला आहे. तर इतर राज्यांत घवघवीत यश मिळवलं आहे. भाजपने मिळवलेल्या या विजयानंतर महाराष्ट्र भाजपने राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि शिवसेनेवर (Shiv Sena) निशाणा साधला आहे.
या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या दोन्ही पक्षांनी आपले उमेदवार रिंगणात उतरवले होते. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेला गोव्यात नोटा पेक्षाही कमी मते मिळाले आहेत. यावरुनच भाजपने या दोन्ही पक्षांना डिवचलं आहे.
लग्नानंतर प्रियकरासोबत संबंध; गर्भवती झाली महिला, मुंबई हायकोर्टाने दिली गर्भपाताला परवानगी
तुमच्या मुलालाही आहे मधुमेहाचा धोका! 'ही' काळजी घेऊन रोखा आजार, Video
वडिलांसोबत पाहिलेलं स्वप्न केलं पूर्ण, झोपडपट्टीतील तरूण बनला सरकारी अधिकारी
ओरिएंटल एज्युकेशन सोसायटीमध्ये पारपडला दीक्षांत सोहळा, 190 विद्यार्थ्यांना मिळाल्या पदव्या
वांद्रे-वर्सोवा सागरी मार्गाला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नाव, मुख्यमंत्र्यांची घोषणा
MHADA Lottery 2023 : 4 हजार घरांची म्हाडाकडून बंपर लॉटरी! पाहा कधीपर्यंत करता येणार अर्ज?
Live Updates : महाबळेश्वरला मुसळधार पावसानं झोडपलं
Thane News : ठाण्यात पार पडलं लाडक्या कुत्र्याचं वर्षश्राद्ध, भावुक प्रसंगाचे पाहा Photos
जॉब हवाय ना? मग आपल्या मुंबईत मिळतोय की; तब्बल 1178 पदांसाठी बंपर ओपनिंग्स; इथे करा अप्लाय
Pune News : पुणे लोकसभा मतदारसंघ कोणाचा? अशोक चव्हाणांनी स्पष्टच सांगितलं
पुणे पोटनिवडणूक राष्ट्रवादी लढवणार? राऊतांच्या ट्विटनं काँग्रेसचं टेन्शन वाढलं
महाराष्ट्र भाजपने ट्विट करत म्हटलं, या दोन्ही पक्षांची स्पर्धा नोटा सोबत असणार हे देवेंद्र फडणवीस यांनी आधीच सांगितलं होतं.
नोटा : 6439 मते (1.1%)
राष्ट्रवादी काँग्रेस : 5058
शिवसेना : 1099 (0.2%)
दोन्ही मिळून : 6157 (1%)
हर्बल इफेक्ट नुसार दोन्ही पक्षांचे नेते, 2024 ला पंतप्रधान होतील.
उत्तरप्रदेश तो झाँकी है, महाराष्ट्र बाकी है
भाजपचे नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी म्हटलं, देशात एक नेतृत्व नागरिकांनी मान्य केलं आहे आणि ते म्हणजे भाजपचं आहे. भाजपचे विचार, त्यांचे कर्तृत्व, वागणं, बोलणं यावर नागरिकांचा विश्वास आहे. पाच राज्यांच्या निवडणुकीत चार राज्यांत भाजपने मुसंडी मारली आहे. भाजप बहुमत मिळवत मुख्यमंत्री बसवणार आहे. संपूर्ण देश हा लवकरच भाजपामय होईल. उत्तरप्रदेश तो झाँकी है, महाराष्ट्र अभी बाकी है, महाराष्ट्रात देखील त्याचे परिणाम लवकरच दिसून येतील.
5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या निकालांचे परिणाम महाराष्ट्रात लवकरच दिसून येतील असं सूचक विधान गिरीश महाजन यांनी केले आहे. गिरीश महाजन यांनी केलेल्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
'10 मार्चनंतर महाराष्ट्रात भाजपचं सरकार येईल'
10 मार्चनंतर राज्यात सत्ताबदल होईल असं वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी एका मेळाव्यात म्हटलं होतं. कार्यकर्त्यांना संबोधित करत असताना काही दिवसांपूर्वी चंद्रकांत पाटील यांनी हे विधान केलं होतं. त्यामुळे राज्यातील राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगण्यास सुरुवात झाली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags:Assembly Election, BJP, Goa, NCP, Shiv sena