या लुंगीची किंमत माहितीये? फक्त 8 हजार रुपये!

फ्लोईंग स्कर्ट नावाखाली झारानं लाँच केलेलं त्यांचं नवीन उत्पादन हे दुसरं-तिसरं काही नसून लुंगी आहे. आणि या लुंगीची जोरदार चर्चा टविटरवर सुरू आहे.

Sonali Deshpande
31 जानेवारी : सध्या टविटरवर जोरदार चर्चा आहे ती लुंगीची. कारण आहे ती लुंगीची किंमत.लुंगीची किंमत किती असू शकते? अंदाज तर करा. 200 रुपये...300 रुपये,  जास्तीत जास्त 500 रुपये.... पण झारा या फॅशन ब्रँडनी  बाजारात नवीन लुंगी आणलीये आणि या लुंगीची किंमत आहे 8 हजार 200 रुपये.फ्लोईंग स्कर्ट नावाखाली झारानं लाँच केलेलं त्यांचं नवीन उत्पादन हे दुसरं-तिसरं काही नसून लुंगी आहे. आणि या लुंगीची जोरदार चर्चा टविटरवर सुरू आहे.चेन्नई एक्सप्रेसमध्ये शाहरुख खानने घातलेल्या लुंगीपासून ते गँग ऑफ वसेपुरमधल्या नवाजुद्दीन सिद्दीकीचा लुंगीमधला फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतायत.  पण या लुंगीचं काही वेगळंच आहे. 300 रुपयांची लुंगी 8 हजाराला विकण्यावरून झाराची टिंगल उडवण्यात येतेय.

Trending Now