कामामुळे वैतागल्याचा व्हिडिओ शूट करा आणि जिंका देशभर फिरण्याची स्कॉलरशिप!

कोणत्याही कारणाने काय तुम्ही तुमची नोकरी सोडताय? रोजच्या कामातून निघून मस्त बाहेर फिरायचं आहे? तुम्हाला तुमचं स्वतंत्र आयुष्य अनुभवायचंय? तर तुमच्यासाठी ही बातमी सगळ्यात महत्त्वाची आणि आनंददायी आहे. तुमच्या कामापासून तुम्ही नाराज असल्याचा व्हिडिओ शूट करा आणि जिंका स्कॉलरशिप ! तुम्हला यावर विश्वास नाही आहे का, पण मंडळी हे खरं आहे. लाईफस्टाईल चॅनल टीएलसी एक वर्षांच्या प्रवासी शिष्यवृत्तीच्या माध्यमातून अत्यंत कठीण कामात अडकलेल्या लोकांना देश फिरण्याची दुर्मिळ संधी देत आहे. या शिष्यवृत्तीमध्ये विजेत्याला देशाच्या सगळ्यात दूरच्या ठिकाणी प्रवास करण्याची संधी मिळणार आहे. या प्रवासात विजेत्याला देशभरातल्या सगळ्या पदार्थांची चव चाखता येणार आहे. या सगळ्यातून आयुष्य जगण्याचा आनंद देण्याचा टीएलसीचा प्रयत्न आहे. त्याचबरोबर विजेत्याला 'द कॉलिंग' या नव्या कार्यक्रमात स्टारडम देण्यात येणार आहे.

पण वाचकहो, या चॅनलच्या माहितीनुसार हे सगळं मिळवणं काही कठीण नाही आहे. ही शिष्यवृत्ती स्पर्धा सगळ्यात अनोखी स्पर्धा आहे. या शिष्यवृत्तीसाठी तुम्हाला तुमच्या आयुष्यातल्या सगळ्या दुखांना लोकांसमोर आणायचं आहे. तेही फक्त तीन मिनिटांत. तीन मिनिटांत आपली सगळ्यात जास्त दुख लोकांसमोर आणणारे तीन जण ही शिष्यवृत्ती जिंकणार आहे. टीएलसी या तीन फूड आणि ट्रव्हल दिवाण्यांच्या शोधात आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या कामाला वैतागला आहात तर पुढच्या 12 महिन्यात देशवारी करण्यासाठी आपली बॅग भरायला सुरूवात करा. पहिल्या तीन महिन्यांच्या शिष्यवृत्त्या 'द कॉलिंग' या शोचा नवा चेहरा म्हणून सर्व शहरांमध्ये भेटीसाठी पाठवण्यात येईल. आणि उर्वरित कालावधीत विजेत्यांना टीएलसी सोशल मीडियासाठी ब्लॉग तयार करावे लागतील. द कॉलिंग या शोद्वारे विजेत्यांना 8 राज्यांमध्ये फिरण्याची, तिथली संस्कृती जाणून घेण्याची. आणि तिथे नवे मित्र बनवण्याची संधी देणार आहे. तिथेही त्यांना अनेक स्पर्धा खेळाव्या लागणार आहे.

Trending Now