अवघ्या १९४७ रुपयांत मिळतोय ४४ हजारांचा फोन

विवो कंपनी यावर्षीचा ७२ वा भारतीय स्वातंत्र्य दिवस एका अनोख्या पद्धतीने साजरा करणार आहे. ७२ तास चालणाऱ्या या सेलला विवो फ्रिडम कार्निवल असे नाव देण्यात आले आहे. या सेलचे वैशिष्ट्य म्हणजे यात तुम्ही विवोद्वारे लॉन्च केलेले फोन आणि व्ही ९ हा फोन फक्त १९४७ रुपयांमध्ये विकत घेऊ शकतो. या फोनची किंमत साधारणपणे ४४, ९९० आणि २२, ९९० रुपये एवढी आहे. या सेलची सुरूवात ७ ऑगस्टपासून सुरू झाली असून उद्या अर्थात ९ ऑगस्टपर्यंत हा सेल ग्राहकांसाठी सुरू असणार आहे.

या सेलमध्ये तुम्हाला मनपसंत सूट तर मिळतच आहे, शिवाय अनेक फोनवर कॅशबॅकची ऑफरही मिळत आहे. तसेच ईयरफोन्स, यूएसबी केबलसारख्या वस्तू फक्त ७२ रुपयांमध्ये मिळत आहेत. या सेलमध्ये काही फोनवर ४ हजारपर्यंत कॅशबॅक मिळणार आहे. त्याचबरोबर NEX, V9, X21 या फोनवर १२०० रुपये तर vivo V7 आणि V7+ फोनवर १००० रुपयांची सूट देण्यात येणार आहे. काही स्मार्ट फोनवर १२ महिन्यांसाठी फ्री ईएमआयची सुविधाही देण्यात आली आहे. तुम्हाला जर या फ्रिडम कार्निवल सेलचा फायदा घ्यायचा असेल तर shop.vivo.com/in या साईटवर जाऊन तुम्ही मनमुराद शॉपिंग करु शकता.

Trending Now