इतिहासात सर्वांत श्रीमंतांमध्ये अकबरचे नाव, जाणून घ्या टॉप 5 मध्ये कोण ?

मुंबई, १७ जुलै . टाइम मॅगझीनने जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती यांची लिस्ट बनवली. ज्यामध्ये आत्तापर्यंतच्या इतिहासातील श्रीमंतांचा समावेश आहे. अमेझॉन डॉट कॉम इंकचे संस्थापक जेफ बेजोस हे आजच्या काळातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती बनला आहे. त्यांची एकूण संपत्ती १५,००० करोड डॉलरहुन अधिक आहे. म्हणजेच जवळ जवळ १० लाख करोड रुपये इतकी. ब्लूमबर्ग इंडेक्सच्या मते 150 अरब डॉलरसह जगातील सर्वांत श्रीमंतांच्या यादीत जेफ बेजोस पहिल्या स्थानावर आहे. हि झाली आत्ताची गोष्ट पण आता आपण जाणून घेऊया इतिहासातील काही श्रीमंतांची नसे. या लिस्ट मध्ये नं. ५ वर आहेत अमेरिकेचे ऐंड्रयू कार्नेज (1835-1919) : असा मानलं जातंय की आत्तापर्यंत अमेरिकेत ऐंड्रयू कार्नेजपेक्षा श्रीमंत कोणीच नाही झालं. 1901मध्ये त्यांनी आपली यूएस स्टील 48 करोड डॉलरला विकली. 2014मध्ये त्यांची संपत्ती 372 अरब डॉलर होती. भारतीय बादशहा अकबर (1542-1605) हा या लिस्टमध्ये चौथ्या स्थानावर आहे. कधीकाळी अकबरकडे जगातील एक चतुर्थाउंश संपत्ती होती. आर्थिक इतिहासकार ऐंगस मैडिसनने लिहिलं होतं की अकबरच्या वेळीस भारताकडे जीडीपी एलिझाबेथच्या इंग्लंडच्या बरोबर होती.

चीनचे सम्राट शेंजोग (1048-1085) हे तिसऱ्या स्थानावर आहेत. चीनचे आर्थिक इतिहासकार प्रोफेसर रोनाल्ड एडवर्ड्सच्या मते सोंग वंशाचे शासक शेजोंग कडे संपूर्ण जगातील 25 ते 30 टक्के संपत्ती होती. त्यांनतर रोमचे ऑगस्ट सीजर, (63बीसी-14एडी) या लिस्टमध्ये येतात. स्टॅनफर्डचे प्रोफेसर इयान मोरिसच्या मते रोमकडे संपूर्ण जगातील 25 ते 30 टक्के संपत्ती होती. आणि या संपत्तीचा 20 टक्के हिस्सा सम्राट सीजरकडे होता. सीजरची संपत्ती 4.6 अरब डॉलर होती. या लिस्ट मध्ये पहिल्या क्रमांकावर आहे मालीचे मनसा मूसा (1280-1337) : फेरम कॉलेजमधील इतिहासकार प्रोफेसर रिचर्ड स्मिथ म्हणतात की, मूसाच्या वेळेस त्यांचं राज्य हे सगळ्यात जास्त सोनं असणारं राज्य होत. मूसाकडे एकूण 2 लाख सेना होती. ज्यामध्ये 40 हजार निशानेबाज होते. इतिहासकारांच्या मते, त्यावेळीस सगळ्यात जास्त सेने असल्याने ते सर्वांत जास्त श्रीमंत होते.

Trending Now