आज कुठल्या राशींना आहे प्रवास योग?

Sonali Deshpande
मेष - चंद्र तुमच्या राशीच्या पराक्रमात आहे. कुटुंब, कार्यालय इथे काही समस्यांनी तणाव निर्माण होऊ शकतो. पैशाची काळजी राहील. मन आक्रमक राहील. जोडीदाराबरोबर भांडण होईल. औषधांवर खर्च होईल. विद्यार्थ्यांनी कठीण विषय मेहनतीनं पूर्ण करा. वृषभ - आज चंद्र आपल्या धनस्थानी आहेत. आज पूर्ण दिवस तुमचाच आहे. तुम्ही सकारात्मक विचार कराल. तुमच्या रागावर तुम्ही नियंत्रण ठेवू शकाल. जोडीदारासोबत आनंदाचे संबंध असतील. चांगले पैसे मिळतील. नोकरीत वरिष्ठ तुमच्या कामाचं कौतुक करतील. विद्यार्थ्यांना यश मिळेल. मिथुन - आज चंद्र तुमच्या राशीत आहे. चंद्रावर शनीची सरळ दृष्टी असेल. आज काम पूर्ण करण्यात थोडी अडचण येऊ शकते. पैशाची चिंता सतावेल. वैयक्तिक आयुष्यात उदासी, आळस जाणवेल. कुटुंबाची चिंता जाणवेल. नोकरीत प्रतिकुलता अनुभवाल. आज तुमचे प्रेमसंबंध तुटण्याची शक्यता आहे. तब्येत नाजुक राहील. विद्यार्थ्यांनी वादविवाद टाळावा.

कर्क - तुमचा राशीस्वामी बाराव्या स्थानात आहे. आजचा दिवस शांततेनं घालवा. वादापासून दूर राहा. आजचा दिवस अनुकूल नाही. दुसऱ्यावर विनाकारण विश्वास ठेवू नका. आज तुम्ही प्रेमप्रस्तावापासून दूर रहा. तुम्ही फसवले जाऊ शकता. सिंह - आज तुमचा विचार सकारात्मक असेल. चंद्र तुमच्या लाभस्थानी आहे. शनी तुमच्या राशीच्या पंचम स्थानी असेल. आज तुम्ही आत्मविश्वासानं पुढे जाल. वैयक्तिक समस्या सोडवण्यासाठी मित्रांची मदत मिळेल. चांगले पैसे मिळतील. जोडीदाराबरोबर प्रेमाचे संबंध राहतील. विद्यार्थ्यांसाठी चांगलं यश मिळेल. कन्या - आजचा दिवस चांगला असेल. तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्ही प्रगती कराल. नोकरीत नव्या संधी उपलब्ध होतील. वरिष्ठांबरोबर नम्र राहिलात तर फायदा होईल. नोकरीत आश्चर्यकारक चांगले अनुभव येतील. प्रमोशन मिळेल. दाम्पत्य जीवन सुखी होईल. विद्यार्थ्यांसमोर यश हात जोडून उभे राहील. तूळ - आज शनी वक्री आहे. तरीही तुम्हाला सकारात्मक अनुभव येतील. मोठं लक्ष्य पार करू शकाल. जुनी महत्त्वाकांक्षा पूर्ण होईल. चांगले पैसे मिळतील. जोडीदाराबरोबर फिरायला जाऊ शकता. विद्यार्थ्यांना परदेशात जायची संधी मिळेल. वृश्चिक - नोकरीच्या शोधात असाल तर नव्या लोकांशी मुलाखत होईल. त्यांची मदत मिळेल. आज प्रवासाचा योग आहे. जोडीदाराबरोबर जास्त भावुक होऊ नका. भावनांवर नियंत्रण ठेवा. मोठं पाऊल विचारपूर्वक उचला. पैशाचा तणाव जाणवेल. विद्यार्थ्यांना कष्ट करावे लागतील. धनू - आजचा दिवस सामान्य असेल. पण तुम्ही सकारात्मक राहाल. तुमची अडलेली कामं पूर्ण होतील. जोडीदाराबरोबर भांडण होईल, भूतकाळातल्या वाईट गोष्टी आठवू नका. तब्येतीची काळजी घ्या. विद्यार्थ्यांना तणाव जाणवेल. मकर - चंद्र शत्रूस्थानी असेल. तुम्हाला यश चालून येईन. दिवस चांगला जाईल. नोकरीचा प्रस्ताव येईल. आयुष्यात बदल होईल. दाम्पत्य जीवन सुखद राहील. नोकरीत तुमचं कौतुक होईल. विद्यार्थ्यांना मेहनत घ्यावी लागेल. कुंभ - दिवस चांगला जाईल. चंद्र पाचव्या स्थानावर आहे. राशीस्वामी लाभात आहे. दिवसभर उत्साह राहील. तुम्ही एखादं नवं पुस्तक वाचाल आणि त्यापासून प्रेरणा घ्याल. कुटुंबाबरोबर छोटे प्रवास होतील. जोडीदाराबरोबर चांगले संबंध राहतील. विद्यार्थ्यांना चांगली मदत मिळेल. मीन - आज तुम्हाला चिंता सतावेल. पण आत्मविश्वास ठेवलात तर संकटांवर मात करू शकाल. भावनांवर नियंत्रण ठेवा. प्रवास कराल. जोडीदाराबरोबर अनेक संभ्रम राहतील. वाहन, घर यावर खर्च होईल. थकावट जाणवेल. विद्यार्थ्यांनी मेहनत घ्यावी.

Trending Now