कुठल्या राशीला आज घ्यावी लागणार जास्त काळजी?

Sonali Deshpande
मेष - चंद्र आज दुपारपर्यंत बारावा असेल. नंतर आपली रास मंगळ आणि गुरूच्या दृष्टिक्षेपात राहील. तुमच्या समोर कठीण काम पूर्ण करायचं आव्हान राहील. जवळच्या मित्रांशी संपर्क झाला, तर तुमचं काम सोपं होऊन जाईल. तुम्ही जास्त संवेदनशील राहाल. तुम्हाला एखाद्याकडून प्रेमाचा किंवा विवाहाचा प्रस्ताव येईल. वृषभ - आजचा दिवस नम्र राहिलात तर दिवस शांतीपूर्ण जाईल.तुम्हाला यश मिळेल. आत्मविश्वासही वाढेल. तुमचा दिवस प्रतिकुल नाही, तरीही तुम्हाला संकटाला सामना करावा लागेल. तरीही तुम्ही तुमच्या कार्यक्षेत्रात चांगलं काम कराल, पण तुमचे वरिष्ठ तुमचं श्रेय दुसऱ्याला देतील. मिथुन - आज चंद्र तुमच्या राशीत कर्मस्थानी आहे. तुमचा निश्चयी स्वभाव आज जागृत असेल. तुमचे विचार स्पष्ट असतील. तुम्ही विचलीत होणार नाही. योग्य वेळी योग्य पावलं उचलल्यामुळे तुम्ही यशस्वी व्हाल. चांगल्या बातम्या मिळतील.

कर्क - आज चंद्र भाग्य स्थानातून कर्म स्थानाकडे प्रस्थान करेल.नवी नोकरी मिळेल, तशी संधी उपलब्ध होईल. आज तुम्ही जास्त संवेदनशील राहाल. मित्र किंवा विरोधकांसोबत शांततेनं काम करा. थोडा तणाव जाणवेल. सिंह - आज दुपारी अष्टमात असलेल्या चंद्रापासून मुक्ती मिळेल. आजचा दिवस कालच्यापेक्षा चांगला आहे. तरीही तुमच्या मनात असंतोष राहीलच. जास्त आडमुठेपणा करू नका. आत्मविश्वास ठेवा. आपले वरिष्ठ तुम्हाला मदत करतील. मित्रांचा सल्ला घ्यायची ही वेळ चांगली नाही. कन्या - आजचा दिवस चांगला आहे. सकारात्मक आहे. चंद्र सातव्या स्थानातून आठव्या स्थानाकडे जाईल. तुम्हाला आज खूप संधी चालून येतील. त्यातून तुमची प्रगती होईल. सामाजिक क्षेत्रात तुम्ही सक्रीय राहाल.तुमचा जोडीदार रागावू शकतो. त्याचा राग घालवायला प्रयत्न करावे लागतील. तूळ - आजचा दिवस चांगला असेल. खूप सकारात्मक घटना घडतील. ज्यामुळे तुम्ही खूश नाही तर आश्चर्यचकित व्हाल. आज तुमच्या हातून काही चुका होणार नाहीत. कुणा अनोळखी व्यक्तीशी ओळख होईल. वृश्चिक - आज चंद्र पाचव्या स्थानातून सहाव्या स्थानावर प्रस्थान करेल. त्यामुळे आजचा दिवस कठीण आहे. अडचणी येतील, जबाबदारी वाढतील. कुठलाही मोठा निर्णय घेऊ नका. भूतकाळातल्या काही आठवणींनी मन दु:खी होईल. धनू - आज तुम्ही मानसिक संतुलन कायम ठेवा. यश नाही मिळालं तरी दु:खी होऊ नका. दुपारपर्यंत तुम्ही बेचैन राहाल. नोकरी-धंद्यात चांगलं यश मात्र मिळेल. मकर - आजचा दिवस सकारात्मक असेल. तुम्हाला सगळीकडून खूप यश मिळेल. मोठ्या योजना आखाल. नोकरी-धंद्यात पैसा नक्की मिळेल. कुंभ - आजची दिवस फार अनुकूल नाही.मनात नकारात्मक भाव येतील. कामात फारसं लक्ष राहणार नाही. कंटाळा आला तरी आराम करायला संधी मिळणार नाही. नोकरीत तणाव राहील. मीन - आज आव्हानात्मक स्थिती राहील. तुम्हाला संकटाशी सामना करावा लागेल. तुमचा सगळा उत्साह अचानक कमी होईल. पैसे जास्त खर्च होतील. 

Trending Now