आज या राशींच्या लोकांसमोर आहेत आव्हान

Sonali Deshpande
मेष- आज चंद्र तुमच्या राशीच्या चौथ्या स्थानावर आहे. तिथे आधीच सूर्य, बुध आणि राहू उपस्थित आहेत. आज तुम्हाला थोडा तणाव जाणवेल. थकावट येईल. मनात दुष्ट विचारही येतील. आज आपल्या हातून एखादं अनैतिक काम होण्याची शक्यता आहे. वृषभ - खूप दिवसांनी तुम्ही प्रसन्न राहाल. आनंदी राहाल. यश मिळेल. नोकरीच्या शोधात असाल तर नोकरी मिळेल. तुमच्या प्रयत्नांना यश मिळेल. मिथुन - चंद्र तुमच्या धनस्थानी आहे.तुम्हाला आज तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवावं लागेल. मनात निराशा दाटून येईल. तुमच्या यशावर याचा परिणाम होऊ शकतो.

कर्क - चंद्रासहित तीन ग्रह आणि राहू तुमच्या राशीत आहे. आजचा दिवस चांगला आणि आनंदी जाईल.तुम्ही तुमच्याच मूडमध्ये राहाल. पण थोडा व्यवहारही नीट बघा. सिंह - आज तीन ग्रह आणि राहू तुमच्या राशीच्या बाराव्या स्थानात राहील. आज अडचणींचा सामना करावा लागेल. मन आणि शरीर कमजोर जाणवेल. पण तरीही तुम्ही सगळ्या संकटावर मात करू शकाल. कन्या - आजचा दिवस प्रगतीचा आहे. जीवनात तुम्ही पुढे जाल. यशस्वी होण्यासाठी तुम्ही दृढ निश्चय कराल. नको त्या गोष्टी मागे सोडून जाल. तूळ - आजचा दिवस चांगला आहे. कार्यक्षेत्रात प्रगती कराल. तुम्हाला पुढे जायचं असेल तर तुमचं कौशल्य विकसीत करावं लागेल. वृश्चिक - चंद्र तुमच्या राशीत भाग्यात आहे. तुम्ही तुमची परिस्थिती सुधाराल. आज भूतकाळातल्या चुकीचं परिमार्जन करू शकाल. धनू - आज तुम्ही एकदम ताजेतवाने राहाल. पण यशस्वी होण्यासाठी जास्त प्रयत्न करावे लागतील. तुमचा आत्मविश्वास चांगला राहील. घरी काही नवे उपक्रम कराल. मकर - आजचा दिवस चांगला आहे. जेवढे प्रयत्न कराल तेवढं मोठं यश मिळेल. आज भाग्याची साथ मिळेल. तुमचं लक्ष जोडीदाराकडे लागेल. तुमचं वैवाहिक जीवन परिपूर्ण राहील. कुंभ - तुमच्या शत्रूस्थानी तीन ग्रह आहेत. दिवस सकारात्मक असेल. तुम्ही तुमच्याती सोबतच्या लोकांच्या पुढे प्रगती कराल.तुमची योग्यता, क्षमता वाढेल. संपर्क वाढतील. मीन - पंचमात तीन ग्रह आहेत. दिवस आव्हानात्मक असेल. तुम्हाला धैर्य ठेवावं लागेल. कुठलंही काम विचारपूर्वक करा.

Trending Now