या महिन्यात कुठल्या राशीची होणार पगारवाढ?

Sonali Deshpande
मेष - चंद्र आपल्या राशीच्या नक्षत्रात आहे. कौटुंबिक संबंधात तणाव जाणवेल. जोडीदारबरोबर झालेलं भांडण वाढू देऊ नका. आज तुमची खूप धावपळ होईल. तुम्हाला आज मानसिक तणाव जाणवेल. विद्यार्थ्यांना एकाग्रता वाढवावी लागेल. वृषभ - आज दिवसभर चंद्र तुमच्या राशीत आहे. आजचा दिवस चांगला असेल.तुम्ही हट्टीपणा केलात तर मात्र कठीण आहे. विश्वासू लोकांच्या भेटीगाठी घ्या. आज तुम्ही तुमची मुलं, शिक्षण याचा जास्त विचार कराल. जोडीदाराबरोबर चांगले संबंध राहतील. तुमचं पोट आज बिघडू शकतं. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस चांगला आहे. मिथुन - आज चंद्र उच्च स्थानावर आहे. तुमची राशीपासून बाराव्या स्थानावर आहे. तुमचा दिवस संमिश्र असेल. तुम्ही तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवा. जोडीदाराबरोबर बोलताना काळजी घ्या. गोष्टी बिघडू शकतात. जास्त खर्च होऊ शकतो. विद्यार्थ्यांचा दिवस चांगला जाईल.

कर्क - आजचा दिवस चांगला आहे. आज कुठल्याही अडचणींना तोंड द्यावं लागणार नाही. पूर्ण दिवस शांततापूर्ण जाईल. बरेच दिवस अडकलेलं काम पूर्ण होईल. तुम्हाला आज तुमच्या मित्रांना मदत करावी लागेल. जोडीदारासोबत प्रेमाचे संबंध असताल. पगारवाढ होईल. विद्यार्थ्यांना शिक्षकांची मदत मिळेल. सिंह - कुटुंबातल्या वादांमध्ये अडकू नका. आज तुमचा प्रभावशील व्यक्तींशी ओळख होईल. तुम्ही नोकरी शोधत असाल, तर तशी संधी चालून येईल. थोडी धावपळ होईल. जोडीदाराबरोबर तणाव असला तर तो निवळेल. मन प्रसन्न राहील. पैसा मिळेल. विद्यार्थ्यांना मेहनत जास्त करावी लागेल. कन्या - तुम्ही आज उत्साही राहिलात, तर जास्त बरं. मनात उगाचंच नको त्या गोष्टीचं भय वाटेल. फळाची अपेक्षा न ठेवता कर्म करा. जोडीदारासोबत नाटकी वागू नका. भावनेवर नियंत्रण ठेवा. घरासाठी पैसे खर्च करावे लागतील. तब्येत चांगली राहील. विद्यार्थ्यांना यश मिळेल. तूळ - चंद्र अष्टमात आहे. तुम्हाला मनात हिंमत ठेवावी लागेल. तुम्ही जवळच्या व्यक्तींपासून सावधान रहा. आज तुम्हाला खऱ्या मित्रांची ओळख होईल. अनेक बुरखे फाडले जातील. जोडीदारासोबत वाद होई शकतो.जास्त खर्च होईल. विद्यार्थ्यांना तणाव जाणवेल. मेहनत करा. वृश्चिक - आजचा दिवस व्यग्र असेल. पण यश मिळाल्यानं समाधान वाटेल. आज पदोन्नती, पगारवाढ नक्की होईल. तुमच्या क्षमतांचा विकास होईल. जोडीदाराबरोबरचे संबंध चांगले राहतील. आज धनलाभ आहे. विद्यार्थ्यांचं शिक्षक कौतुक करतील. धनू - दिवस उत्तम आहे. मेहनत थोडी जास्त करावी लागेल. नोकरीचा प्रस्ताव मिळेल. जुन्या मित्रांच्या भेटी होतील. तुमच्या कार्यक्षेत्रात आव्हानांना तोंड द्यावं लागेल. मानसिक तणाव राहील. तुमची आज जुन्या प्रेमिकेबरोबर भेट होईल. आज तुम्ही जास्त रोमँटिक राहाल. प्रकृती चांगली राहील. विद्यार्थ्यांना मेहनत केली तर यश मिळेल. मकर - आज तुम्ही बेचैन राहाल. पण तुम्ही व्यावहारिक रहा. भूतकाळातल्या काही आठवणी सतावतील. तुम्ही नोकरी किंवा विवाहाच्या प्रस्तावाची वाट पहाल. जोडीदाराबरोबरच्या प्रेमात वृद्धीच होईल. तब्येत नगमगरम राहील. विद्यार्थ्यांना चांगलं यश मिळेल. कुंभ - आजचा दिवस संमिश्र जाईल. कुठे आनंद, तर कुठे दु:ख असा दिवस असेल. तुम्ही समतोल राहा. तुम्ही आज एखादी महत्त्वाची वस्तू विसरू शकता. कामात अडचणी येतील. जोडीदारासोबत भांडण होईल. नोकरीत यश मिळेल. विद्यार्थ्यांना भाग्याची साथ मिळेल. मीन - आज तुमच्या लेखन क्षमतेमुळे तुम्हाला यश मिळेल. तुमच्या लेखनाचं कौतुक होईल. पण वाद होऊ शकतो. क्रोधावर नियंत्रण असू द्या. जोडीदाराबरोबर गोड बोला. संबंध चांगले राहतील. पैसा चांगला मिळेल. विद्यार्थ्यांना यश मिळेल.

Trending Now