आज 'या' राशींना आहे जास्त धनप्राप्ती

Sonali Deshpande
मेष - आज तुमच्या राशीत चंद्र आहे. आजचा दिवस आनंदी जाईल. व्यक्तिगत जीवनात प्रसन्न वाटेल. आपण सध्या खूप मेहनत करताय. त्याचं फळ नक्की मिळेल. पण राशीस्वामी वक्री होतोय. गुरूची तुमच्या राशीवर सरळ दृष्टी आहे. कदाचित थोडी भांडणं होतील. पण व्यक्तिगत आयुष्यात तुम्ही भाग्यवान राहाल. तुम्हाला आज कुणी प्रपोझ करेल. थोडा मानसिक तणाव राहील वृषभ - चंद्र बारावा असेल. तुमचं कामात लक्ष लागणार नाही. तरीही मागे राहिलेली काही कामं पूर्ण होतील. दिवस सकारात्मक असेल. तुमचा आत्मविश्वास वाढेल.काही रचनात्मक काम कराल. जोडीदारासोबत आज खरेदीला जाल. आरोग्य चांगलं राहील. पण दिवसाच्या शेवटी थकावट जाणवेल. वरिष्ठ तुमचं कौतुक करतील. मिथुन - राशीस्वामी बुध वक्री असेल. चंद्र लाभस्थानी आहे. दिवस शांततेनं जाईल. तुम्हाला नवं घर खरेदी करत असाल, तर कागदपत्रांकडे काळजीपूर्वक पाहा. अडचणी येऊ शकतात. जोडीदारासोबत वाद होणार नाही याची काळजी घ्या. आज तुम्हाला तुमच्या पोटाचीही काळजी घ्यावी लागेल. सार्वजनिक ठिकाणी काही भांडण होऊ शकतं. विद्यार्थ्यांनी जास्त मेहनत घ्यावी.

कर्क - चंद्र आपल्या राशीत कर्माच्या ठिकाणी आहे. मंगळ वक्री आहे. आजचा दिवस चांगला आहे. काही आव्हानांना तोंड द्यावं लागेल. व्यवसायातल्या भागीदारासोबतच्या संबंधात परिवर्तन येईल. तुमच्या आॅफिसमध्ये तुमची एखादी नवी प्रेमकहाणी सुरू होऊ शकते. जोडीदाराच्या तब्येतीची काळजी घ्या. पैसे जपून वापरा.आईकडच्या नातेवाईकांची थोडी काळजी घ्यावी लागेल. सिंह - आजचा दिवस संमिश्र आहे. यश मिळेल. पण पैशाच्या बाबतीत अडचणी येतील. एखादा मित्र व्यवसायाबद्दल चांगला प्रस्ताव देतील. प्रेमिकांचे आज चांगले संबंध राहतील. आरोग्य चांगले राहील, मन प्रसन्न राहील. विद्यार्थ्यांना वरिष्ठांची मदत मिळेल. कन्या - आज चंद्र अष्टम स्थानात आहे. दिवस चांगला जाईल. तुम्हाला सिद्ध करायला संधी मिळेल. तुम्ही एखादा मोठा निर्णय घ्याल. नव्या नोकरीचा प्रस्ताव मिळेल. अनेक क्षेत्रात तुमची नवी सुरुवात होईल. जोडीदाराबद्दल आत्मियता वाढेल. प्रकृतीच्या तक्रारी कमी होतील. तूळ - चंद्र सातव्या स्थानात आहे. तुम्ही घरापासून दूर असाल, तर आज घरची आठवण जास्त येईल. अचानक आई-वडिलांची भेट होईल. कुठलाही निर्णय घेण्याआधी गांभीर्यानं विचार करा. मनात कसली ना कसली चिंता सतावेल. जोडीाराबद्दल तुम्ही हळवे व्हाल. नोकरीत आव्हानं वाढतील. नव्या नोकरीच्या संधी उपलब्ध होतील. वृश्चिक - आजचा दिवस सावधानतेने घालवा. तुमचा एखादा मित्र किंवा भाऊ विरोधक होणार नाही याची काळजी घ्या. इच्छित परिणाम मिळणार नाहीत. बोलण्यावर नियंत्रण ठेवा. जोडीदाराशी वाद होतील. घराची दुरुस्ती करावी लागेल.अचानक पैसे खर्च होतील. आरोग्य ठीक राहील. पण कानदुखी उद्भवू शकते. धनू - तुमचा दिवस चांगला असेल. प्रसन्न असेल. प्रत्येक ठिकाणी यश मिळेल. मुलांची मात्र चिंता सतावेल. कुटुंबात शुभ घटना घडेल. अचानक पैसा मिळेल. पगारवाढ होऊ शकते. विद्यार्थ्यांना संधी प्राप्त होतील. मकर - चंद्र आज तुमच्या सुखस्थानी आहे. दिवस प्रसन्न असेल. तुम्ही अंतर्मुख होऊन बराच विचार कराल. तुम्हाला आज विवाहाचा प्रस्ताव मिळेल. प्रवास होईल, पण काळजी घ्या. जोडीदारासोबत अहंकार दाखवू नका. नोकरीत अडचणी येतील. प्रकृती नरमगरम असेल. कुंभ - आजचा दिवस उत्साही असेल. चंद्र तुमच्या पराक्रमाच्या स्थानावर आहे. आज पैशासंबंधी चांगले व्यवहार होऊ शकतात. प्रामाणिकपणे पैसे मिळवा. कुटुंबावर पैसे खर्च करा. जोडीदाराबरोबर बाहेर फिरायला जाल. प्रकृती चांगली राहील. आज तुम्ही इलेक्ट्राॅनिक उपकरणं खरेदी करू शकाल. मीन - आजचा दिवस शानदार असेल. लांबलेली कामं पूर्ण होतील. जीवनात मोठं परिवर्तन येणार आहे. तुम्हाला आवडणाऱ्या व्यक्तींचा सहवास तुम्हाला मिळेल. जोडीदारासोबत असताना कुठलाही अप्रिय विषय काढू नका. नोकरीत वरिष्ठ खूश होतील, पगारवाढ मिळेल. आरोग्य चांगलं राहील.

Trending Now