मुंबई, 24 मार्च : अनेकदा लोक मानेच्या दुखण्याकडे दुर्लक्ष करतात, परंतु या दुखण्यामुळे हात आणि पाय सुन्न होणे. तसेच अशक्तपणादेखील येऊ शकतो. ही समस्या हाडांशी संबंधित आहे, यामुळे खांदे, मान इत्यादींमध्ये खूप तीव्र वेदना होतात. ज्याला आपण सर्व्हायकल पेन म्हणतो. अशा प्रकारची समस्या कोणत्याही व्यक्तीला होऊ शकते. आजच्या काळात अनियमित दिनचर्यामुळे जवळजवळ प्रत्येक तिसर्या व्यक्तीला सर्व्हायकलचा त्रास होतो.
सर्व्हायकल पेन होण्याची कारणे
- जोनास हॉपकिन्स मेडिसिननुसार चुकीच्या स्थितीत झोपल्याने सर्व्हायकलच्या वेदना होऊ शकतात.
- डोक्यावर जास्त भार उचलल्यामुळेही अनेकांना सर्व्हायकाल पेन होऊ शकते.
- जर तुम्ही मान जास्त वेळ वाकवून ठेवली तर तुम्हाला सर्व्हायकल पेन होऊ शकते.
Fish Lover : फक्त चवीवर जाऊ नका, फायद्यानुसार पाहा तुम्ही कोणते मासे खायला हवेत
- जर तुम्ही एकाच स्थितीत बराच वेळ बसलात तर तुम्हाला सर्व्हायकल पेन सुरू होते.
- उंच आणि मोठ्या उशीवर झोपल्याने ग्रीवेच्या वेदना होतात.
- उठणे, बसणे आणि झोपण्याच्या चुकीच्या पद्धतींमुळेदेखील सर्व्हायकल पेनच्या समस्या उद्भवू शकतात.
सर्व्हायकल पेनची लक्षणे
- तीव्र डोकेदुखी
- मान हलवल्यावर हाडांमधून आवाज येणे
- हात, मनगट आणि बोटांमध्ये अशक्तपणा, मुंग्या येणे किंवा बधीरपणा
- हात आणि पाय अशक्त झाल्यामुळे चालण्यात अडचण आणि संतुलन गमावणे
- मान आणि खांद्यावर कडकपणा
Avocado peel benefits : अॅव्होकाडो खाल्ल्यानंतर त्याची साल फेकून देता? हे फायदे वाचून थक्क व्हाल
ही सर्व लक्षणे सर्व्हायकल पेनची आहेत. त्याकडे दुर्लक्ष करण्याची चूक करू नये. ही लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधावा. कधी कधी हे दुखणे सर्व्हायकल कॅन्सरचेही रूप धारण करू शकते. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार विचारून योग्य ते उपचार घ्यावेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags:Disease symptoms, Health, Health Tips, Lifestyle