तणाव कमी करायचा असेल तर रोज सकाळी करा हे प्रयोग

मुंबई, १६ जुलै . आजकालच्या धकाधकीच्या जीवनात लोकांना पुरेसा आराम मिळणं कठीण झालंय. लोकांची दिनचर्या इतकी व्यस्त असते की त्यांना साधा श्वास घ्यायला सुद्धा वेळ मिळत नाही. आणि त्यामुळे त्यांच्यातील तणाव वाढत चाललाय. तणाव कमी करून जर तुम्हाला तुमच्या शरीराला आराम द्यायचा असेल तर रोज सकाळी खाली दिलेले हे ३ प्रकार नक्की करून पहा. बहुतांश लोक दिवसभर कामात व्यस्त असतात. त्यामुळे दिवसभर त्यांना तणाव कमी करण्यासाठी काही करायला वेळ मिळत नाही. त्यामुळे त्यांच्यासाठी तणाव कमी करायला सकाळची वेळ ही उत्तम असेल. रोज सकाळी उठल्यावर सगळ्यात आधी घरातील खिडकी, दरवाजे उघडावीत. यामुळे सकाळची ताजी हवा आणि सूर्यकिरणे ही आत येतील. असे केल्याने शरीरातील मेलाटोनीनची निर्मिती कमी होईल आणि एड्रनलिन वाढेल. यामुळे दिवसभरातील तुमची होणारी चीडचीड कमी होईल.

रोज सकाळी उठल्यावर व्यायाम नक्की करा. तणाव कमी करण्याचा हा एक अतिशय महत्त्वाचा उपाय आहे. रोज किमान ३० मिनिटे सकाळी कोवळ्या वातावरणात व्यायाम करावा. व्यायामासोबत रोज सकाळी चिंतन करा. याने शरीरातील सगळा थकवा निघून जाईल. त्याचबरोबर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही सकाळी गाणी सुद्धा ऐकू शकता. याने तुमच्या दिवसाची सुरुवात चांगली होऊ शकते. रात्री झोपण्यापूर्वी अलार्म लावून झोपा. आणि हा अलार्म तुम्हाला उठायच्या वेळे आधी १५ मिनिटे आधीचा लावा. यामुळे तुम्हला सकाळी १५ मिनिट तुमची दिनक्रम करण्याचा वेळ मिळेल. ज्यामुले तुम्ही वेळेत काम पूर्ण करू शकाल. आणि तुमचा तणावही कमी होईल.

Trending Now