या ६ गोष्टी खाल्ल्यास तंदुरूस्त राहिल तुमचं हृदय

तंदुरूस्त हृदयासाठी चालणं हे जेवढं आवश्यक आहे, तेवढंच आवश्यक सकस आहारही आहे.

जर तुम्हाला प्रदीर्घ काळासाठी हृदय ताजंतवानं ठेवायचं असेल तर या सहा गोष्टींचा तुमच्या डाएटमध्ये समावेश करायलाच हवा. कलिंगड- कलिंगडमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असते. कलिंगडची खासियत म्हणजे याच कॅलरीही कमी असतात. तसेच अण्टिऑक्सीडेंटचे प्रमाण भरपूर प्रमाणात असते. विटामीन सी, ए, पोटॅशियम, आणि मॅग्नेशियमचे पूर्ण सत्त्व कलिंगडमधून मिळतात.

टॉमेटोही हृदयासाठी असतो उपयुक्त. टॉमेटोमधून विटामीन सी मिळते. टॉमेटोमध्ये लाइकोपीनचे प्रमाण भरपूर असते. विटामीन सी आणि अण्टिऑक्सीडेंटचे टॉमेटोमध्ये असलेल्या प्रमाणाचा हृदयाला फायदाच होतो. इतर फळांप्रमाणे बेरीजमध्येही अण्टिऑक्सीडेंचटे प्रमाण जास्त असते. चांगले कोलेस्ट्रॉल वाढायला मदत करते. अंगातील चरबीचे रुपांतर उत्साहात करते. तसेच हाडांसाठी बेरीज हे फळ उत्तम आहे. हृदयासाठी बीन्सही तितकेच फायदेशीर आहेत. बीन्समध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असते. बेरीजप्रमाणे चांगले कोलेस्ट्रॉल वाढायला मदत करते. बीन्समध्ये मॅग्नेशियम, कॅल्शियम आणि ओमेगा ३ फॅट्स चे सत्त्व अधिक प्रमाणात असतात. याचा हृदयाला फार फायदा होतो. एवोकाडोमध्ये मोनोसॅच्युरेटेड फॅट्स असतात. पोटॅशियमचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात असते. एवोकाडोमुळे रक्तदाम नियंत्रित राहण्यास मदत होते. अक्रोडमध्ये ओमेगा ३ फॅट्स आणि अण्टिऑक्सिडेंटचे प्रमाण अधिक असते. दिवसाला एक अक्रोड खाल्ल्यास हृदयाचे विकार फारसे होत नाहीत.

Trending Now