आनंदी राहण्यासाठी करून पाहा हे ६ उपाय

कधीतरी काहीही काम न करता स्वस्त बसून राहण्यातही वेगळाच आनंद असतो. कधी तरी दुपारच्यावेळी एक झोप काढणं, चहा पीता पीता सुर्यास्त पाहणं किंवा एखादा दिवस कोणतीही कामं न करता पुस्तक वाचत राहणं. याला काहीजणं आळशीपणा असंही म्हणतील. पण हा आळस नसून स्वतःसाठी काढलेला निवांत वेळ असतो. आज आम्ही तुम्हाला असे सहा पर्याय देणार आहोत ज्यामुळे व्यस्त जीवनात तुम्हाला थोडा निवांतपणा मिळेल. दररोज किमान १० मिनिटं काहीच न करण्याचं निश्चित करा. काहीही करायचं नाही म्हणजे विचारही करायचा नाही. तुमच्या फोनला एक दिवस सुट्टी द्या. त्यादिवशी कोणालाही मेसेज करायचा नाही, तसेच कॉलही करायचा नाही. एवढंच नाही तर इंटरनेटसुद्धा वापरायचा नाही. घरातल्या प्राण्यासोबत वेळ घालवा.

कोणत्याही बागेत जाऊन डोळे बंद करुन काही वेळ शांत बसा. त्यावेळी पक्षांचा आवाज, निसर्गाचा आवाद ऐकण्याचा प्रयत्न करा. मला आता या कामासाठी वेळ द्यायचा आहे अशा त्रासिक भावनेने कामाला किंवा दिवसाला सुरूवात करु नका. शांत बसताना खोलीत टीव्ही, व्हिडिओ किंवा म्युझिक सिस्टीम पूर्णपणे बंद ठेवा. तुम्ही जे काम करता ते नक्कीच महत्त्वाचे आहे.पण, कामातून वेळ काढून तुमच्यातील कलेलाही प्राधान्य द्या. आपल्याला जे आवडेल त्यासाठी वेळ दिला तर मन जास्त आनंदी राहतं.

Trending Now