पॅनकार्डमध्ये झाले हे महत्त्वाचे बदल, तुम्ही पाहिलेत का ?

सरकारने काही महिन्यांआधीच PAN (पर्मनेंट अकाऊंट नंबर)मध्ये बदल केले आहे. या बदलांसाठी सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सने देखील एक अधिसूचना जारी केली आहे. ही अधिसूचना इनकम टॅक्स कायद्याच्या कलम 139 ए आणि 295 अंतर्गत जारी करण्यात आलं आहे. या नवीन अधिसूचनेसाठी नवे अॅप्लिकेशन फॉर्मदेखील काढण्यात आले आहे. जाणून घेऊयात काय आहेत हे नवीन बदल खरंतर, या नव्या अधिसूचनेनुसार, आता पॅनकार्डसाठी फॉर्म भरताना तृतीय पंथीयांना अॅप्लिकेशन फॉर्ममध्ये टिक बॉक्स देण्यात येईल. पॅन कार्डच्या अर्जामध्ये बदल व्हावेत अशा अनेक सूचना तृतीय पंथीयांकडून करण्यात आल्या होत्या. त्याच आधारे हे नवे बदल करण्यात आले आहेत. तृतीय पंथींना पॅनकार्डाचा अर्ज भरताना खूप त्रास होतो. तसं आधार कार्डमध्ये अशा अनेक सूचना आहेत ज्या पॅनकार्डमध्ये उपलब्ध नाही आहेत, त्याचा तोटा असा की त्यामुळे तृतीय पंथींना त्यांचे पॅनकार्ड हे आधारशी लिंक करता येत नाही.

पॅन म्हणजे 10 अंकी यूनिक नंबर : पॅन म्हणजे एक 10 अंकी यूनिक अल्फान्यूमेरिक नंबर असतो, जो इनकम टॅक्स डिपार्टमेंटकडून प्रत्येकी आणि कंपनींना जारी करण्य़ात येतो. सरकारने आता आधारला आयटीआर फाईल आणि नवे पॅनकार्ड बनवण्यासाठी अनिवार्य केले आहे. पॅन म्हणजे 10 अंकी यूनिक नंबर : पॅन म्हणजे एक 10 अंकी यूनिक अल्फान्यूमेरिक नंबर असतो, जो इनकम टॅक्स डिपार्टमेंटकडून प्रत्येकी आणि कंपनींना जारी करण्य़ात येतो. सरकारने आता आधारला आयटीआर फाईल आणि नवे पॅनकार्ड बनवण्यासाठी अनिवार्य केले आहे.

Trending Now