Teachers Day : आयुष्याला दिशा देणाऱ्या मान्यवरांचे ६ विचार

डॉ. राधाकृष्ण यांचे शिक्षकांप्रती असलेले प्रेम व आदर पाहून त्यांचा जन्मदिन हा 'शिक्षक दिन' म्हणून साजरा केला जातो. 1962 मध्ये डॉ. राधाकृष्णन् यांनी राष्ट्रपती पदाची शपथ घेतली तेव्हा त्यांचा जन्मदिवस हा शिक्षकांचा गौरव दिन म्हणून साजरा करण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली होती. त्यानंतर 5 सप्टेंबर हा त्यांचा जन्मदिवस दरवर्षी शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो.

सर्वपल्ली राधाकृष्णन - ज्या प्रमाणे मातीच्या गोळ्याला कुंभार आकार देऊन त्यापासून एखादी प्रतिकृती तयार करत असतो, अगदी त्याचप्रमाणे शिक्षक बालकांच्या कोर्‍या मनावर योग्य संस्कार करून त्यातून भविष्यातील जबाबदार नागरिक घडवित असतात. आपल्या आई-वडीलांनंतर शिक्षक हे आपले अप्रत्यक्षरित्या पालकच असतात. स्वामी विवेकानंद - उत्तम माणूस घडवणं हे शिक्षणाचं ध्येय असावं. मुलांची वैचारिक, शारिरीक आणि अध्यात्मिक प्रगती करण्याचं कौशल्य शिक्षक विकसित करू शकतात. महात्मा गांधी - मुलांना मुक्तपणे विचार करायला कोण शिकवू शकतो असा प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर आहे शिक्षक. सर्व बाजूंचे विचार आत्मसात करून स्वत:चा नवा विचार करायला शिकवणं हे शिक्षकाचं काम आहे.

डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम - चारित्र्य निर्माण हा शिक्षणाचा खरा उद्देश आहे आणि चारित्र्यवान नागरिक घडवण्याचं काम शिक्षक करत असतात. शिक्षकांनी मुलांची मनं प्रज्वलित केली पाहिजे. डॉ. रघुनाथ माशेलकर - विद्यार्थ्यांच्या सर्व क्षमता एकत्र करून त्याला दिशा देण्याचं काम शिक्षक करतो. असे आदर्श शिक्षक मिळाल्यानेच माझ्या आयुष्याला दिशा मिळाली. माझं आयुष्यबदलून गेलं. 

Trending Now