आपल्या एसबीआय अकाऊंटच्या या ६ गोष्टी कोणालाही सांगू नका...

बँक कोणत्याही ग्राहकाला त्यांचे यूजर आईडी, पिन, पासवर्ड, सीवीवी, ओटीपी, वीपीए (यूपीआई) अशा संवेदनशील गोष्टींची माहिती विचारत नाही. याबद्दलच्या अधिक माहितीसाठी तुम्ही बँकेचे सोशल मीडिया अकाऊंट फॉलो करु शकता. सार्वजनिक ठिकाणी ऑनलाइन अकाऊंट वापरू नका- रेल्वे स्टेशन, बस स्टँड अशा सार्वजनिक ठिकाणी फ्री- वाय- फायची सोय असते. याचा फायदा घेऊन अनेकजण त्यांचे अनेक अप सुरू करतात. पण चुकूनही बँकेचे ऑनलाइन अप ओपन करु नका. यातून तुमच्या खात्याची माहिती लीक होण्याची भिती असते.

पिन, पासवर्ड, सीवीवी, ओटीपी शेअर करु नका- हल्ली तुमचा पिन, पासवर्ड, सीवीवी, ओटीपी विचारणारे अनेक फोन येतात. बँकेतून फोन करतोय असं सांगून ते तुमच्याकडून एटीएम पीन आणि सीवीवी कोड मागून घेतात. असे केल्याने तुमच्या खात्यातून पैसे जाऊ शकतात. म्हणून चुकूनही कोणाला तुमचा पीन, सीवीवी नंबर देऊ नका. एटीएम कार्ड कोणालाही देऊ नका- तुमचे डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्ड कोणालाही देऊ नका. तसेच या कार्डचे डिटेलही कोणासोबत शेअर करु नका. असे केल्यास तुमच्या अप्रत्यक्ष खात्यातून पैसे गहाळ होण्याची शक्यता अधिक असते. बँकेचे अकाऊंट डिटेल फोनमध्ये सेव्ह करु नका- बँक अकाउंट नंबर, पासवर्ड, एटीएम कार्ड नंबर किंवा पासवर्डचा फोटो काढून तो फोनमध्ये सेव्ह करु नका. या सर्व गोष्टी तुमच्या फोनमधून लीक होऊ शकतात.

Trending Now