एसबीआयचे ग्राहक आहात तर व्हा सतर्क, एका एसएमएसमुळे रिकामी होऊ शकतं तुमचं अकाऊंट

एसबीआयमध्ये आपलं खातं आहे म्हणजे आपली बचत सुरक्षित आहे असाच ग्राहकांचा विश्वास असतो. आता याच विश्वासाला तडा जाताना दिसत आहे. यासाठी बँक कारणीभूत नसून वाढत जाणारे गुन्हे आहेत. बँकेच्या नावे एसएमएस पाठवून अनेक ग्राहकांची फसवणूक केली जात आहे. एसएमएसमध्ये ग्राहकांना त्यांच्या खात्याची माहिती विचारली जाते.

बँकेकडून कधीही ग्राहकांना एसएमएसद्वारे त्यांची खासगी माहिती विचारण्यात येत नाही असे स्पष्ट केले. तसेच असा मेसेज आला तर तो नंबर ब्लॉक करण्याचेही एसबीआयकडून सांगण्यात आले आहे. सध्या एसबीआयकडे ग्राहकांच्या अशा तक्रावी वाढत असल्यामुळे त्यांनी ग्राहकांना सावध राहण्यास सांगितले आहे.

Trending Now