या तारखेपर्यंत SBIचे डेबिट कार्ड नाही बदलले तर होईल नुकसान

27 ऑगस्ट : देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने (एसबीआय)आपल्या सर्व ग्राहकांना आपले डेबिट कार्ड एका ईएमव्ही चिप आधारित कार्डाने 31 डिसेंबर 2018 पर्यंत बदलण्याची सूचना दिली आहे. देशातील वाढती गुन्हेगारी आणि सायबर क्राईम कमी करण्यासाठी आणि त्यातून ग्राहकांना सुरक्षित ठेवण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) बँकांना फक्त चिप आधारित आणि पिनवर आधारित डेबिट आणि क्रेडिट कार्ड जारी करण्यास सांगितले आहे. नव्या डेबिट कार्डने काय फायदा होईल? ईएमव्ही चिप कार्ड खोट्या आणि नकली कार्डद्वारे होणाऱ्या फसवणुकीवर नियंत्रण ठेवते.

नवीन ईएमपीव्ही कार्ड आणि पिन सुविधा ग्राहकांना फसवणूकीपासून वाचवेल. एसबीआयने आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, 'प्रिय ग्राहक, हा बदलण्याचा काळ आहे. रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, 2018 च्या अखेरीस, आपल्या मेगस्ट्रिप डेबिट कार्डला ईएमव्ही चिप डेबिट कार्डासह बदलणे आवश्यक आहे. त्यासाठी तुम्हाला कसलेच पैस भरावे लागणार नाहीत. ' जून अखेरपर्यंत, एसबीआयने 28.9 दशलक्ष एटीएमसह डेबिट कार्ड्स जारी केले आहेत. यापैकी बहुतेक चिप आधारित कार्ड आहेत. भारतीय रिझर्व्ह बॅंकांच्या सूचनांनुसार, काही अन्य बँकादेखील मेगस्ट्रिप कार्डला ईएमव्हीने बदलणार आहेत

Trending Now