तोंडाला वास येतोय? हे उपाय करून पहा

तोंडाचा घाणेरडा वास घालवण्यासाठी फक्त महागडे माऊथवॉशच नाही तर शरीरातील पाण्याची पातळी राखण्याचीही काळजी घेतली पाहिजे.

Sonali Deshpande
23 नोव्हेंबर : आपण नेहमी तोंड साफ ठेवतो, त्यासाठी अनेकदा महागड्या टुथपेस्ट वापरतो. पण तरी अनेक वेळा तोंडाचा घाणेरडा वास येतो. तोंडाच्या घाणेरड्या वासामुळे आपलं इंप्रेशन डाऊन होतं.सार्वजनिक ठिकाणी ते फारच लज्जास्पद असतं. तोंडाचा घाणेरडा वास घालवण्यासाठी फक्त महागडे माऊथवॉशच नाही तर शरीरातील पाण्याची पातळी राखण्याचीही काळजी घेतली पाहिजे.तोंडाचा घाणेरडा वास घालवण्यासाठी खालील उपाय तुम्हाला मदत करू शकतात.- शरीरातील पाण्याची पातळी योग्य असेल तरच आपला श्वास ताजा राहतो. शरीरातील पाण्याची पातळी कमी झाल्याने तोंडात लाळेचं प्रमाणही कमी होतं आणि म्हणून तोंडाचा वास येतो.- व्हिटॅमिन सी - संत्री, लिंबू किंवा सगळ्या आंबट रस असणाऱ्या पदार्थांमध्ये व्हिटॅमिन सीचं प्रमाण मोठ्या प्रमाणात असतं. हे पदार्थ श्वासातील दुर्गंधी कमी करण्यास मदत करते. 'व्हिटॅमिन सी'ला 'बॅक्टेरिया-फाइटिंग' पदार्थ असेही म्हणतात.

- सफरचंद - सफरचंद कापून खाल्ल्याने तोंडात लाळ येण्याचं प्रमाण वाढतं. त्याने तोंडाची योग्यरीत्या सफाई होते. यात तोंडातले सगळे किटाणू निघून जातात.-पाणी - शरीरातील पाण्याची पातळी कमी होऊ देऊ नका. शरीरात जर पाण्याची कमतरता जाणवल्यास द्रव पदार्थांचे सेवन करा.तोंडात पाणी घेऊन हळुवार गुळण्या केल्या तर त्यानेही तोंडाची दुर्गंधी कमी होण्यास मदत होते.- दालचिनी - गरम मसाल्यातील दालचिनीचा चहा करून प्यायल्याने तोंडाचा घाणेरडा वास जातो.

Trending Now