१५ ऑगस्टला होणार जीओ फोन २ चं प्री- बुकिंग

रिलायन्स इंडस्ट्रीजच्या अन्युअल जनरल मीटींगमध्ये (AGM) जीओ फोन- २ ची घोषणा करण्यात आली. आता स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून ग्राहकांसाठी रिलायन्सने एक खूशखबर आणली आहे. १५ ऑगस्टला जीओ फोन २ चं बुकिंग सुरु होणार आहे. जीओ फोन २ हा ४ जी फीचर फोन असून यामध्ये फिझीकल क्वार्टी कीपॅडची सुविधा देण्यात आली आहे. त्याचबरोबर फोनमध्ये व्हॉट्सअप आणि युट्युबसारखे फिचरही उपलब्ध आहेत. या फीचर्समुळे तुम्ही व्हॉट्सअपसोबत युट्युबवर व्हीडिओदेखील पाहू शकता. हा फोन फक्त २९९९ रुपयांत तुम्ही खरेदी करु शकता. तुम्हाला जर जीओ फोन २ चे बुकिंग करायचे असेल तर तुम्ही जीओच्या ऑफिशिअल वेबसाइटवर (www.jio.com) किंवा MyJio अप डाऊनलोड करु शकता.

वेबसाइटवर गेल्यावर रजिस्ट्रेशन पेजवर जाऊन Get Now या ऑप्शनवर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला तुमचं नाव, फोन नंबर, पत्ता आणि इतर माहिती द्यावी लागेल. ग्राहकांना जीओ फोन २ चे पूर्ण पैसे ऑनलाइन ट्रान्सफर करावे लागतील. त्यानंतर तुम्हाला हा फोन कधीपर्यंत मिळेल ही माहिती दिली जाईल. जीओ फोन २ मध्ये २.४ इंचीचा डिस्प्ले देण्यात आला आहे. त्याचबरोबर 512MB चा रॅमही असणार आहे. 4GB चे इंटरनल स्टोरेजसह अतिरिक्त एसडी कार्ड टाकून १२८ जीबीपर्यंत मेमरी वाढवता येऊ शकते. कॅमेराबद्दल बोलायचे झाले तर त्याचा रियर कॅमेरा २ मेगापिक्सल आहे आणि सेल्फीसाठी या मोबाइलमध्ये व्हीजीए कॅमेरा ठेवण्यात आला आहे. या फोनमध्ये व्हाय- फाय, जीपीएस, ब्लूटूथ आणि एफएमची सुविधा दिलेली नाही. या फोनमध्ये २ हजार मेगाहर्ट्सची बॅटरी असणार आहे. या फोनमध्ये वॉइस असिस्टेंटसाठी एक डेडिकेटेड बटन देण्यात आले आहे. फोनमध्ये २४ भारतीय भाषांचा समावेश करण्यात आला असून व्हॉइस कमांडचाही सपोर्ट मोबाइलला देण्यात आला आहे.

Trending Now