...म्हणून पांढऱ्या मीठापेक्षा लाभदायक आहे काळं मीठ

जेवणात मीठ हे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. मिठाचे प्रमाण जर कमी जास्त झालं तर जेवणाची चवच बदलून जाते. असे असले तरी अनेकांच्या घरात आजही पांढऱ्या मिठाचा वापर सर्वाधिक केला जातो. पण तुम्हाला माहित आहे का की, रोजच्या जेवणात पांढऱ्या मिठाचा वापर करण्यापेक्षा काळ्या मिठाचा वापर करणे शरीरासाठी अधिक लाभदायक आहे. जेवणात काळ्या मीठाचा वापर केल्याने शरीरातील रक्तदाब सुरळीत होतो. त्याचबरोबर कॉलेस्ट्रॉल, मधुमेह आणि पोटासंबंधित आजार कमी होतात. आज आम्ही तुम्हाला काळ्या मिठाचे सेवन केल्याने काय फायदे होतात ते सांगणार आहोत.

रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रीत ठेवतं- जेवणात काळ्या मिठाचा वापर केल्यास रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रीत होते. हे मीठ लहान मुलांच्या तब्येतीसाठी गुणकारी आहे. जेवणात काळे मीठ टाकल्याने मुलांना पोटदुखी, कफ यासारखे आजार कमी होतात. काळ्या मिठामध्ये खनिजाचं प्रमाण मोठ्या प्रमाणात असतं. यामुळे कोलेस्ट्रॉलचं प्रमाण कमी राखण्यास काळ मीठ मोठ्या प्रमाणात मदत करतं. तसेच हार्मोन्स बॅलन्ससाठीही काळं मीठ उपयुक्त आहे. लठ्ठपणा कमी होतो- काळ्या मिठातील खनिज शरीरातील विषाणू मारायला उपयुक्त असते. यामुळे लठ्ठपणा कमी होतो. तसेच शरीराची पचनशक्तीही सुधारते. स्नायुंच्या वेदनांपासून मुक्तता- काळ्या मिठामुळे सांधे दुखी होत नाही. यासाठी तुम्ही एका कापडामध्ये काळ्या मिठाचे खडे घ्यायचे. ते कापड बांधून तव्यावर गरम करायचे. त्या गरम मिठाचा शेक स्नायू आणि सांध्यांना दिल्याने वेदनांपासून आराम मिळतो. असिडिटीपासून सुटका- असिडिटीचा त्रास अनेकांना होतो. काळ्या मिठामुळे पोटातील असीड कमी होण्यास मदत होते. यामुळे घशात होणारी जळजळदेखील कमी होते. असिडिटीवर इलाज म्हणून लोक अनेक उपाय करतात. पण आता तुम्हाला याची गरज नाही. काळ्या मिठामुळे शरीरातील असिडिटी कमी होते. गॅसची समस्या कमी- पोटातील गॅसची समस्या कमी करण्यासाठी काळ मीठ अत्यंत गुणकारी आहे. एका कॉपरच्या पॅनमध्ये काळं मीठ गरम करायचं. मीठाचा रंग बदलेपर्यंत ते मीठ गरम करायचं. गरम झालेले एक चमचा मीठ एक ग्लास पाण्यात टाकून प्यावे.

Trending Now