या राशीच्या लोकांना येऊ शकतात प्रेमविवाहमध्ये अडचणी

Sonali Deshpande
मेष - तुमच्या राशीत आज चंद्र लाभाच्या स्थानावर आहे. आज तुम्हाला आशावादी राहायला हरकत नाही. तुम्हाला तुमच्या महत्त्वाकांक्षा पूर्ण करायला बरीच संधी मिळणार आहे. नव्या लोकांशी तुमचा संपर्क येईल. चांगली मैत्री होईल. पण सगळ्यांवर तुम्ही विश्वास ठेवू नका. आजच्या दिवशी तुमचा फायदा होईल. त्यामुळे आजचा दिवस व्यर्थ जाऊ देऊ नका. वृषभ - आज चंद्र तुमच्या कर्म स्थानी आहे. तुम्ही तुमच्या कामकाजात बरीच सकारात्मकता अनुभवाल. तुमच्यातल्या आंतरिक शक्तीमुळे तुम्ही तुमच्या लक्ष्याच्या जवळ पोचाल. तुम्हाला हवं ते मिळवण्यासाठी आजचा दिवस शुभ आहे. तुम्हाला तुमचे सहकारी, बाॅस यांची मदत मिळेल. तुमच्या नातेवाईकांपैकी एकाची चांगली बातमी आज कळेल. मिथुन - आज चंद्र तुमच्या भाग्याच्या स्थानात आहे. त्यामुळे आजच्या दिवशी तुम्हाला जास्त मेहनत करावी लागेल. कदाचित निराशाही पदरात पडेल. मेहनत जास्त करावी लागेल. कामकाजात तुमची महत्त्वाकांक्षा मोठी आहे. त्यामुळे अशाच एका महत्त्वाच्या व्यक्तीशी संपर्क साधण्याकडे तुमचं सगळं लक्ष असेल.

कर्क - तुमच्या राशीत चंद्र आठव्या स्थानावर आहे. तुमच्यासाठी आजचा दिवस सोपा नसेल. कितीही प्रयत्न केलेत तरी हवं असलेलं फळ मिळणं कठीण होऊन जाईल. अनेक ठिकाणी निराशा होईल. पण घाबरू नका. धैर्य ठेवा. शांत रहा. त्यामुळे दिवस सहज जाईल. मध्ये निराशा मनाला ग्रासेल. पण आत्मविश्वास ठेवा. कोणी तुमच्यावर टीका करेल. पण तुम्ही विचलीत होऊ नका. सिंह - आजचा दिवस तुमच्यासाठी खूप चांगला जाईल. तुमच्या प्रयत्नांना यश मिळेल. मेहनत थोडी जास्त करावी लागेल. तुम्ही प्रेमात असाल आणि लग्नाच्या गोष्टी पुढे सरकवायच्या असतील, तर आज थोडं कठीण आहे. तुमच्या कुटुंबातले किंवा तुमच्या जोडीदाराच्या कुटुंबातले लोक तुमच्या लग्नाला विरोध करतील. संयम बाळगा. कन्या - आजचा दिवस चांगला आहे. आज चंद्र तुमच्या शत्रूच्या स्थानावर आहे. त्यामुळे शत्रूंचं भय संपून जाईल. पण आज तुमच्यावर कामाचा जोर जास्त असेल. पण दिवस सकारात्मक आणि अनुकूल आहे. त्यामुळे तुम्ही उत्साही राहाल. पगारवाढ होण्याची शक्यता आहे. तूळ - आज चंद्र पाचव्या स्थानावर असेल. तुमच्यावर आज स्तुतिसुमनांचा वर्षाव होईल. तुम्ही आज सामूहिक कार्यामध्ये यश मिळवाल. तुम्हाला आज एखादं कठीण काम सोपवलं जाईल. पण टीमसोबत ते पूर्ण होईल. तुमचे बाॅस तुमच्यावर विश्वास ठेवतील. त्यामुळे महत्त्वाच्या कामासाठी तुमची निवड होईल. वृश्चिक - आज तुमच्या राशीत चंद्र चौथ्या स्थानावर आहे. त्यामुळे अनेक सुखांपासून आज तुम्हाला वंचित राहावं लागेल. तुम्हाला आज अनेक संकटांना तोंड द्यावं लागेल. आज थकवा, तणाव जाणवेल. नोकरी बदलावीशी वाटेल. परिवर्तन करावसं वाटेल. धनू - आज चंद्र पराक्रमाच्या स्थानावर असेल. आज तुमचा आत्मविश्वास जोरदार असेल. तुमची निर्णय क्षमताही चांगली असेल. तुमचा उत्साहही अपार असेल. पण तुमचा दिवस धावपळीत जाईल. मकर - आज चंद्र तुमच्या संपत्तीच्या स्थानावर आहे. नोकरदार लोकांना आज थोडी चिंता जाणवेल. तुम्हाला सहज भाव ठेवावा लागेल. कुठलंही काम सावधतेनं करा. मोठा निर्णय घेऊ नका. भागीदारीही करू नका. कुंभ - आज चंद्र तुमच्या राशीत आहे. राशीस्वामी वक्री आहे. तुम्हाला नेहमीच्या दिनचर्येत थोड्या संकटांना तोंड द्यावं लागेल. समज कमी असलेल्या लोकांना तोंड द्यावं लागेल. दिवसभर तणाव, बेचैनी जाणवेल. आज कुठलं कठीण काम स्वीकारू नका. मीन - चंद्र तुमच्या राशीत बाराव्या स्थानावर आहे. आजचा दिवस उत्साही नसेल. तणाव जास्त जाणवेल. महत्त्वाच्या कामांमध्ये अडचणी येतील. पण तुम्ही तणाव घेऊ नका. निराशा आली, तरी तुमचं धैर्य कायम राहील. ज्या पदाची अपेक्षा आहे त्यासाठी मेहनत करावी लागेल.

Trending Now