Photos: राणीच्या बागेत पाळणा हलला, भारतात पहिल्या पेंग्विनचा जन्म

राणीच्या बागेत दीर्घकाळाच्या प्रतीक्षेनंतर पाळणा हलला आणि बेबी पेंग्विनचा जन्म झाला. आई प्लिपरने ४० दिवसांनंतर एका बेबी पेंग्विननला जन्म दिला. साधारणपणे पेंग्विंनचे अंडं फुटून त्यातून पिल्लू बाहेर येण्याचा कालावधी हा ४० ते ४५ दिवसांचा असतो. आज ४० दिवसांनीच अंड्यामधून पिल्लू बाहेर आल्याने राणी बागेत एक उत्साहाचे वातावरण आहे. दिवसांनी त्याची डीएनए चाचणी होईल त्यातूनच पिल्लू नर आहे की मादी हे कळून येईल. प्राणी संग्रहालयात सर्वसाधारणपणे कोणत्याही प्राण्याचा जन्म झाला तर त्याची देखभाल संग्रहालयातील केअर टेकर करतात. मात्र राणी बागेतील प्रशासनाने बेबी पेंग्विनचे संगोपन त्याची आईच करेल असे स्पष्ट केले आहे. आई फ्लिपर आणि बाबा मिस्टर मोल्ट आळीपाळीने अंडं उबवण्याचे काम करत होते. मात्र त्यातही गेले पाच दिवस आई प्लिपर काहीही न खाता सतत अंडं उबवत होती. ती एका क्षणासाठीही अंड्यापासून दूर गेली नाही. या काळात तिने काहीच खाल्ले किंवा प्यायले नाही.

भारतात पेग्विंनचा जन्म होण्याची घटना पहिलीच असल्यामुळे डॉक्टर सतत अमेरिकेतील तज्ज्ञांच्या संपर्कात आहेत. पिल्लाच्या जन्मानंतर आई- वडिलांच्या स्वभावात खूप बदल होतात. त्यांच्यातील बदलांना योग्य पद्धतीने हाताळण्यासाठी पशुवैद्यकीय डॉक्टर सातत्याने अमेरिकेतील तज्ज्ञांच्या संपर्कात आहेत. बंदिस्त वातावरणात जन्माला येणारे हे देशातील पहिले पेंग्विन आहे. दरम्यान, बेबी पेंग्विनचे नाव मीच ठेवणार असा हट्ट मिष्का मंगुर्डेकर या सहा वर्षाच्या मुलीने धरला आहे. मिष्का जुहू येथील बेसंट मॉन्टेसरी शाळेत पहिल्या वर्षात शिकते. मिष्काने राणी बाग प्रशासनाकडे बेबी पेंग्विनच्या नावांची आकर्षक यादीच पाठवली आहे. पिल्लू जर नर असेल तर त्याचे नाव अपॉलो, कुकी, वॉडलर आणि मादी असल्यास तिचे नाव वेलव्हेट, व्हॅनिला, आईस क्यूब यापैकी ठेवण्याचा आग्रह तिने धरला आहे. या हम्बोल्ट पेंग्विनची खास बात म्हणजे मिस्टर मोल्ड हा प्लिपरपेक्षा लहान असून राणीच्या बागेत असलेल्या पेंग्विनपैकी या जोडीला सर्वात पौढ जोडी मानली जाते.

Trending Now