रोज ५५ रुपयांची बचत करा आणि १० लाखांचा विमा मिळवा, पोस्ट ऑफिसची ही नवीन ऑफर तुम्हाला कळली का?

या महिन्यात पोस्ट ऑफिस स्वतःची बँक सुरू करणार आहे. पोस्ट ऑफिस तुम्हाला विमाही देते याबद्दल तुम्हाला माहित आहे का? १ फेब्रुवारी १८८४ ब्रिटीश काळापासून भारतात पोस्टल लाइफ इन्शुरन्स म्हणजेच (पीएलआय) सुरु करण्यात आले होते. ही भारतातील सर्वात जुनी जीवन विमा योजना मानली जाते. ४३ लाखांहून अधिक जनता या पीएलआय योजनेचा फायदा घेत आहेत. या योजनेअंतर्गत आता तुम्हाला १० लाख रुपयांपर्यंतचा जीवन विमा मिळू शकेल. नक्की काय आहे ही योजना याबद्दल आज आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत.

पीएलआयचा इतिहास – १८९४ मध्ये या योजनेअंतर्गत पोस्टल आणि टेलीग्राफ विभागातील महिला कर्मचाऱ्यांना विमा संरक्षण दिले. ही अशी वेळ होती जेव्हा इतर विमा कंपनी महिलांना विमा संरक्षण पुरवत नव्हती. पीएलआयच्या योजना- संपूर्ण आयुष्याची सुरक्षा अर्थात पीएलआयच्या या योजनेला सुरक्षा योजना असंही म्हणतात. या योजनेत विमा धारकाच्या मृत्यूनंतर मिळालेला बोनस आणि निश्चित रक्कम कायदेशीर वारसांना दिली जाते. १९ वर्षांपासून ते ५५ वर्षांपर्यंतचे नागरिक या योजनेचा फायदा घेऊ शकतात. पीएलआयच्या या योजनेअंतर्गत किमान २० हजार ते जास्तीत जास्त १० लाख रुपयांच्या विम्याची रक्कम विमाधारकाला मिळते. Endowment Assurance (Santosh): पोस्टल लाइफ इन्शुरन्सची ही योजना ‘संतोष’ म्हणून ओळखली जाते. या योजनेनूसार विमाधारकाचं ज्या वयापर्यंत त्याचा विमा आहे तो पर्यंतची ठरावीक रक्कम त्याला दिली जाते.

Trending Now