स्वस्तात खरेदी करा पेट्रोल-डिझेल, वर्षभरात बचत करा 4800 रुपये

11 सप्टेंबर : फक्त पेट्रोल आणि डिझेलच नाही तर भाज्या आणि इतर गोष्टीही महाग झाल्या आहेत. अशा सगळ्यात आम्ही तुमच्यासाठी स्वस्त दराने पेट्रोल आणि डिझेल खरेदी करण्याचे काही उत्तम पर्याय आणले आहेत. त्यातून तुम्ही स्वस्तात पेट्रोल आणि डिझेल खरेदी करू शकता.

पेट्रोल आणि डिझेलचे वाढलेले दर काही कमी होतील असं वाटत नाही. पण यामुळे सामान्य माणूस प्रचंड अस्वस्थ आहे. या वाढलेल्या किंमतींमुळे काही लोकांनी 4 व्हीलरऐवजी आता 2 व्हीलरचा वापर सुरू केला आहे. बरं मंडळी फक्त पेट्रोल आणि डिझेलच नाही तर भाज्या आणि इतर गोष्टीही महाग झाल्या आहेत. अशा सगळ्यात आम्ही तुमच्यासाठी स्वस्त दराने पेट्रोल आणि डिझेल खरेदी करण्याचे काही उत्तम पर्याय आणले आहेत. त्यातून तुम्ही स्वस्तात पेट्रोल आणि डिझेल खरेदी करू शकता. काही बँकांच्या क्रेडिट कार्डावर इंधन खरेदी केल्यावर तुम्हाला कॅशबॅकसह 1% इंधन अधिभार सवलती मिळतात. या व्यतिरिक्त, रिवॉर्ड पॉईंटदेखील उपलब्ध आहेत या सगळ्यातून तुम्ही मोफत पेट्रोल भरू शकतात. क्रेडिट कार्डातून इंधन खरेदी करण्यासाठी दरमहा 400 रुपयाची सूट मिळते आणि जर असं केलं तर दरवर्षी तुम्ही 4800 रुपये वाचवू शकता. ICICI बँकेच्या क्रेडिट कार्डने HPCL पेट्रोल पंपावरून इंधन खरेदी केली तर त्याचा मोठा फायदा होतो. ICICI बँक HPCL कोरल क्रेडिट कार्ड-मास्टरकार्ड देते. त्यामुळे HPCL पेट्रोल पंपातून इंधन खरेदी करण्यावर तुम्हाला 2.5% कॅशबॅक किंवा 1% सरचार्ज सूट मिळेल.

कोटक रॉयल सिग्‍नेचर क्रेडिट कार्डः 500 ते 3000 रुपये इंधन खरेदीवर सरचार्ज सूट आणि एका वर्षांत 3500 रुपये सरचार्ज सूट मिळते. HPCL कोरल अमेरिकन एक्स्प्रेस क्रेडिट कार्ड: HPCL पेट्रोल पंपातून इंधन खरेदी केल्यावर 2.5 % कॅशबॅक मिळते किंवा HPCL पेट्रोल पंपातून 100 रुपयांचं इंधन खरेदी केल्यावर 6 पेबॅक पॉईंट्स मिळतात. याशिवाय, ICICI बँक HPCL कोरल क्रेडिट कार्ड - व्हिसा आणि HPCL पेट्रोल पंपावरून इंधन खरेदीवर 2.5% कॅशबॅक मिळते. SBI: BPCL SBI कार्डसाठी जॉयनिंग फी दिल्यानंतर 500 रुपयांवर 2000 रिवॉर्ड पॉईंट मिळतात. हे पॉईंट इंधन खरेदी करताना तुम्ही वापरू शकता. बीपीसीएल पेट्रोल पंपातून 4000 रुपये इंधन खरेदी केल्यावर 4.25 टक्के व्हॅल्यूबॅक किंवा 13 पट बक्षीस पॉइंट मिळतात. HSBC बँक: इंधनचा लाभ घेण्यासाठी एचएसबीसी बँकेच्या मेक माय ट्रिप, प्लॅटिनम आणि प्रिमियर क्रेडिट कार्ड्सचा उपयोग केला जाऊ शकतो. त्याच्यामार्फत, 400 ते 4000 रुपयांच्या खरेदीवर आपल्याला 1% इंधन अधिभार सूट मिळते, जे एका वर्षात जास्तीत जास्त 250 रुपयांपर्यंत वाढते. SBI सिंपली सेव्ह: कोणत्याही पेट्रोल पंपावरून इंधन खरेदीवर 1% अधिभार सूट दिली जाईल, परंतु ऑफरचा लाभ घेण्यासाठी, 500 ते 3000 रुपयांपर्यंत व्यवहार करावा लागेल आणि प्रत्येक 100 रुपयांच्या वापरामागे 1 रिवॉर्ड पॉईंट दिला जाईल. HDFC बँक: एचडीएफसी बँक पेट्रोल-डिझेलच्या खरेदीवर 5% कॅशबॅकवर, जास्तीत-जास्त 150 रुपयांपर्यंत आणि 400 रुपयांपेक्षा अधिक इंधन खरेदी केल्यावर 1% अधिभार सूट देण्यात येईल. ऍक्सिस बँक प्लॅटिनम क्रेडिट कार्डः 400 ते 4000 रुपयांपर्यंत इंधन खरेदी करण्यासाठी 1% अधिभार आणि 400 रुपये दरमहा जास्तीत जास्त फायदा मिळतो.

Trending Now