PHOTOS: आयोडिनमुळे थायरॉइडचे हार्मोन्स राहतात नियंत्रित, जाणून घ्या याचे फायदे

आयोडीन हा एक असा पदार्थ आहे जो थायरॉइडच्या हार्मोनसाठी महत्त्वपुर्ण आहे. आयोडीन जेव्हा अमिनो एसिडसोबत एकत्रित होते, तेव्हा थायरॉइड हॉर्मोनची निर्मिती होते. हे हार्मोन शरीरासाठी उपयुक्त असतात. थायरॉक्सिन टी- ४ आणि ट्राईयोडोथायरोनाइन टी- ३ असे थायरॉइड हॉर्मोनचे दोन प्रकार आहेत. जे शरीरातील पेशींमधील मेटाबॉलिज्म नियंत्रीत ठेवते. जेव्हा तुम्ही आयोडीनयुक्त पदार्थ खाणं बंद कराल तेव्हा तुमच्या शरीरात आयोडीनची कमतरता भासते. शरीरात जर आयोडीनचे प्रमाण कमी झाले तर त्याचा तुमच्या प्रतिकारक्षमतेवर वाईट परिणाम होतो. जर तुमच्या शरिरात आयोडीनचे प्रमाण कमी झाले तर थायरॉईडची समस्या उद्बवू शकते. थायरॉइडच्या ग्रंथीमध्ये जर आयोडिनचे प्रमाण कमी झालेत तर ते तुमच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत हानिकारक आहे.

असं म्हंटलं जातं की बटाट्यामध्ये स्टार्च असते. पण तुम्हाला हे माहिती आहे का की त्यामध्येही आयोडीन असते. एका मध्यम आकाराच्य़ा बटाट्यामध्ये ६० माइक्रोग्रॅम आयोडीनचे प्रमाण असते. त्यामुळे रोज तुम्ही एक बटाटा खाल्ला तर तुमच्या शरिरात ४० टक्क्यांने आयोडीनचेप्रमाण वाढते. दूध हे व्हिटॅमिन आणि कॅल्शियम वाढवण्याचे काम करते. पण यामुळे आयोडीनचेप्रमाण देखील वाढते. एका दूधाच्या पेल्यात ५६ माइक्रोग्रॅम आयोडीनचे प्रमाण असते. याशिवाय तुम्ही डाएटमध्ये उकडलेली अंडी, दही, केळं, स्ट्रॉबेरी यांचा वापर करु शकता.

Trending Now