लवकरच सुरू होईल मोदी सरकारची 'ही' स्कीम

पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेत आल्यानंतर काळ्या पैशांवर लगाम लावण्यासाठी जनतेला पैशांचे व्यवहार अधिकतर पद्धतीने ऑनलाइन पद्धतीने करण्यास सांगितले. जनतेला या गोष्टी सुकर व्हाव्यात यासाठी सरकारने अनेक उपाय योजना राबवल्या आहेत.

एक पाऊल पुढे टाकत सरकारने युपीआय अपचे नवीन अपग्रेडेड व्हर्जन आणले आहे. आता केंद्र सरकार जीएसटीला अनुसरून एक देश एक कार्डची व्यवस्था करणार आहे. हे कार्ड फार खास असेल. या कार्डची वैशिष्ट्य पुढील प्रमाणे- या कार्डला सर्वसामान्य डेबिट कार्डप्रमाणे वापरले जाऊ शकते. याशिवाय यात काही खास वैशिष्ट्यही आहेत, ज्यामुळे तुम्ही ऑफलाइनही डिजिटल पेमेंट करु शकता. नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (एनसीएमसी) एक असं कार्ड असेल, ज्यावरुन तुम्ही पैशांचे व्यवहार सोप्या पद्धतीने ऑनलाइन करु शकील. या कार्डवरून बसच्या तिकिटापासून ते घरातल्या किराणा सामानापर्यंत आवश्यक गोष्टींचे व्यवहार तुम्ही या कार्डवरून करु शकणार आहात.

नीति आयोगचे सीईओ अमिताभ कांतने दिलेल्या माहितीनुसार, एक देश एक कार्ड ही सेवा येत्या तीन ते चार महिन्यात अंमलात आणली जाऊ शकते. यामुळे देशातील सर्व प्रकारच्या सार्वजनिक वाहतुकींचा उपयोग फक्त एका स्मार्ट कार्डवरून करण्यात येईल. कांत यांनी सांगितले की, या एका कार्डच्या मदतीने देशभरातील रेल्वे, मेट्रो आणि बस सेवांचा कधीही उपभोग घेतला जाऊ शकेल. कार्डचा उपयोग सुरूवातीला सार्वजनिक परिवहन वाहनांसाठी केला जाईल. या कार्डचा वापर फक्त देशभर फिरण्यासाठीच नसून याचा वापर तुम्ही डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्ड म्हणूनही करु शकता. यामुळे आर्थिक व्यवहार करणं सुकर होईल शिवाय सतत तिकिट काढण्याच्या त्रासातून तुमची कायमस्वरूपी सुटका होईल.

Trending Now