Nagpanchami 2018: वर्षातून फक्त एकच दिवस नागपंचमीला उघडतात ‘या’ मंदिराचे दरवाजे

उज्जैन येथील महाकालेश्वर मंदिराच्या शिखरावरस्थित नागचंद्रेश्वर मंदिराचा दरवाजा वर्षातून एकदाच उघडतो. नागपंचमीच्या निमित्ताने काल बुधवारी रात्री १२ वाजल्यापासून या मंदिरात भक्तांची रांग सुरू झाली. वर्षभरात फक्त २४ तासांसाठीच या मंदिराची दारं खूली असतात. आज बुधवारी १२ वाजेपर्यंत भक्तांना या मंदिरात प्रवेश दिला जाईल. परंपरेनूसार, फक्त नागपंचमीलाच मंदिराचे दार भक्तांसाठी खुले करण्यात येते.

सातव्या दशकातली ही प्रतिमा नेपाळहून आणून महाकाल मंदिराच्या शिखरावर स्थापित केली आहे. हे मंदिर जमिनीपासून जवळपास ६० फूट उंचीवर आहे. सुरूवातीला या मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी काळोख्या वाटेवरून जावे लागे. पूर्वी एकावेळी एकच माणूस या मंदिरात जाऊ शकत होता. काही वर्षांपूर्वी दर्शनासाठी भाविकांची वाढती गर्दी पाहता, मंदिर समिती आणि जिल्हा प्रशासनाने लोखंडाचे जिने तयार केले.

Trending Now