कोणाला वाटलं पेंटिंग तर कोणाला वाटली बाहुली, हे आहे या फोटोमागचं सत्य

हा पुतळा असावा, नाही हे तर पेंटिंग आहे, अरे नाही ही तर बाहुली आहे... खरं सांगू मंडळी ही एक 5 वर्षाची मुलगी आहे. सोशल मीडियाच्या जगात कधी, कोण आणि कसा फेमस होईल हे सांगता येत नाही. आपले कर्तुत्व, आपल्यातील कला, विशेष गुण दाखवण्याचा एक चांगला प्लॅटफॉर्म म्हणजे सोशल मीडिया.

सध्या सोशल मीडियावर एका मुलीचा फोटो व्हायरल होत आहे. पाच वर्षाच्या या मुलीचा फोटो पाहून तुमच्या तोंडातून 'वाह! सुंदर' असे शब्द बाहेर पडल्याशिवाय राहणार नाही. व्हायरल झालेल्या या पाच वर्षीय मुलीचे नाव आहे 'जेरे इजालाना' (Jare Ijalana). जेरे इजालाना हिचे फोटो मोफ बामुयवा या फोटोग्राफरने काढले आहेत. पहिल्या नजरेत ही मुलगी आहे की पुतळा की पेंटिग आहे की बाहुली याबाबत संभ्रम निर्माण होतो. परंतु सावळ्या रंगाची, हरणासारख्या डोळ्याची ही मुलगी सर्वांनाच भूरळ घालत आहे.

Trending Now