चंद्रग्रहणाला ‘या’ गोष्टी चुकूनही करु नका

या शतकातील सर्वात मोठं खग्रास चंद्रग्रहण आज सर्वांना पाहता येणार आहे. १ तास ३० मिनिटे इतकी चंद्राची खग्रास अवस्था असेल. आज रात्री ११ वाजून ५४ मिनिटांनी हे ग्रहण सुरू होईल. त्यामुळे आज रात्री पृथ्वीच्या सावल्यांचा खेळ पाहायला मिळणार आहे. या चंद्रग्रहणाला अनेकजण उपास, दानधर्म, ध्यान, स्तोत्र पठण करतात. पण पुढील गोष्टी ग्रहणाच्या काळात करू नका. ग्रहणाच्यावेळी जेवू नका. ग्रहणावेळी जेवल्यास अनेक व्याधी होतात असे म्हटले जाते. ग्रहणावेळी घरात असलेले जेवण किंवा पेय हे खाण्या- पिण्यासाठी योग्य नसल्याचे म्हटले जाते.

ग्रहण काळात खोटं बोलणं, कपटीपणा करणं, फुशारकी मारणे अशा गोष्टी करु नये. तसेच देवाचे नामःस्मरण करण्याला प्राधान्य द्यावे. देवाच्या मुर्तीला स्पर्श करणे, नखं कापणे, केस कापणे अशा गोष्टी ग्रहण काळात करु नयेत. या काळात लहान मुलं, वृद्ध, गरोदर स्त्रीया तसेच आजारी व्यक्तींनी जेवण जेवल्यास त्यांना कोणताही दोष लागत नाही.

Trending Now