Left Handers Day- ...म्हणून तुमच्यापेक्षा डावखुऱ्यांकडे पैसा असतो जास्त

लहानपणापासून आपल्याला शिकवलं जातं की उजव्या हातानेच जेवावं... लिहावं... सगळी महत्त्वाची कामं ही उजव्या हातानेच करावीत. अनेकदा मुलं डाव्या हाताने कामं करायला लागली तर त्यांना अडवतात आणि उजव्या हाताने काम करण्याचं लक्षात आणून देतात. पण माणसं डावखुरी का असतात याचा कधीच विचार केला जात नाही. आज आम्ही तुम्हाला या डावखुऱ्यांची काही वैशिष्ट्य सांगणार आहोत. संशोधनातून सिद्ध झालं आहे की, डावखुरे हे उजव्या हाताने काम करणाऱ्यांपेक्षा जास्त प्रतिभावान असतात. संशोधनानुसार कोणत्याही क्षेत्रातील १०० टक्के लोकसंख्येमध्ये १० टक्के लोकसंख्या ही डावखुऱ्यांची असते. हे १० टक्के लोक जेवताना, कोणतेही काम करताना आणि लिहितानाही डाव्या हाताचाच वापर करतात. जे लोक काम करताना डाव्या हाताचा अधिक वापर करतात त्यांच्या हातांमध्ये उजव्या हाताने काम करणाऱ्यांपेक्षा अधिक वेग असतो.

डावखुऱ्यांची बौद्धिक पातळीही उजव्या हाताने काम करणाऱ्यांपैक्षा अधिक असते. आयक्यू टेस्टमध्ये यशस्वी होणाऱ्यांच्या यादीत डावखुऱ्यांची संख्या अधिक आहे. डावखुऱ्यांची विचार करण्याची पद्धत आणि परिस्थितीकडे पाहण्याची नजर इतरांपेक्षा वेगळी असते. डावखुरे हे पैसा कमवण्यामध्ये आणि खर्च करणाऱ्यांमध्ये सर्वांच्या पुढे असतात. डावखुऱ्या महिला एकाचवेळी अनेक कामं करु शकतात. याचं एक कारण म्हणजे डावखुऱ्या व्यक्ती एकाचवेळी दोन्ही हातांचा उपयोग समान पद्धतीने करु शकतात. उजव्या हाताने काम करणाऱ्यांचे मात्र असे होत नाही.

Trending Now