जगातले 10 श्रीमंत लोक रोज करतात ही कामं

तरुणांच्या स्वप्नांपुढे आकाशही ढेंगणं वाटायला लागतं. आयुष्याच्या या टप्प्यात अनेकजण नानाविध सल्लेही देत असतात. पण यामुळेच बऱ्याचदा तरुणपिढी संभ्रमीत दिसते. नक्की आयुष्यात काय करायला हवं हेच त्यांना कळत नाही. आज आम्ही तुम्हाला अशा यशस्वी १० लोकांच्या सवयींबद्दल सांगणार आहोत ज्या तुम्ही अंगीकारल्या तर त्याचा नक्कीच फायदा होईल. जे.के. रॉलिंग- हॅरी पॉटर सीरिज प्रसिद्ध होण्यापूर्वी रॉलिंगकडे अयशस्वी व्यक्ती म्हणूनच पाहिलं जायचं. नवऱ्याच्या त्रासाला कंटाळून रॉलिंगने त्याच्यापासून घटस्फोट घेतला. गरीब लोकांना ब्रिटीश सरकारकडून मिळणाऱ्या पैशांवर ती स्वतःचं पोट भरत होती. यशस्वी होण्यापूर्वी तिच्या वाटेला फक्त अवहेलनाच आली. पण नेमकी याच अवहेलनेने आणि अपयशाने तिला खूप काही शिकवले. कामात सातत्य ठेवत तिने अखेर यशाची चव चाखलीच.


स्टीव्ह जॉब्स- अप्पल कंपनीना सर्वोच्च स्थानी घेऊन जाणाऱ्या जॉब्सच्या यशाचा मंत्र होता की, स्वतःपेक्षा मोठ्या धैर्यासाठी काम करा. अशा धैर्याचा ध्यास घ्या जो तुम्हाला सर्वोत्तम काम करायला प्रवृत्त करेल. त्याचा दुसरा मंत्र होता की आपण समाजाचं देणं लागतो. त्यामुळे समाजाला उपयोग होईल अशा गोष्टी करणं. बिल गेट्स- मायक्रोसॉफ्टचे सह- संस्थापक यांचा पटकन मिळणाऱ्या यशावर विश्वास नाही. ते नेहमी त्याच गोष्टींमध्ये गुंतवणूक करतात जिथे मोठ्या काळासाठी यश मिळेल आणि टिकेल. तसेच समाजासाठी दानधर्म करायलाही त्यांना आवडते. या कृतीतून त्यांना ताकद मिळते असे त्यांना अनेक मुलाखतीत सांगितले आहे. एरियाना हफिंग्टन- द हफिंग्टन पोस्टच्या संपादिका एरियाना यांच्या मते, अथक मेहनत करु यश मिळत नाही. तर स्वतःला मोकळं सोडणं, नवे बदल आत्मसात करणं अशा गोष्टींमधून यश मिळत असतं. स्टीवर्ड बटरफील्ड- फ्लिकरचे सह संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी स्टीवर्ड नेहमीच कामाच्या पद्धतीकडे अधिक लक्ष देतात. कंपनी कशापद्धतीने काम करते याकडे त्यांचे विशेष लक्ष असते. सिंथिया टिडवेल- रॉयल नेबर्स ऑफ अमेरिका या विमा कंपनीचे सीईओ सिंथिया यांच्यामते, आयुष्यात धोका पत्करुनच यश मिळू शकते. तरुण पिढी रिस्क घेऊ शकते, त्यामुळे त्यांनी सर्व बाबींचा विचार करुन रिस्क घ्यावी. ब्रायन चेस्की- एअर बीएनबीचे सीईओ चेस्की याच्या मते, आई- वडिल आपल्या आयुष्यातील महत्त्वपूर्ण भाग असले तरी करिअरचे निर्णय त्यांच्या सल्ल्यांनी घेऊ नये. रिक गोइंग- टपरवेअर ब्रॅण्डचे सीईओ रिचे सर्वाधिक लक्ष हे वागणुकीवर असते. त्यांच्या मते, तुम्ही ऑफिसमधल्या सहकाऱ्यांसोबत जसे वागतो, त्याच पद्धतीने तुम्ही जगाकडे पाहत असता. यशस्वी होण्यासाठी तुमची इतरांसोबतची वागणुक फार महत्त्वाची असते. रिचर्ड ब्रँसन- वर्जिन ग्रुपचे संस्थापक रिचर्ड त्यांच्या आईच्या सल्ल्याला नेहमी प्राधान्य देतात. अपयशातून शिकत पुढे जात राहतात. पदरी आलेल्या अपयशाचाच विचार करत ते बसत नाहीत.

Trending Now