सावधान! एकापेक्षा जास्त अकाऊंट असतील तर होऊ शकतात तुमचे पैसे गायब

नोकरदार वर्गाची तर एकाहून अधिक बँके खाती असतात. एक सॅलरी अकाऊंटचं खातं असतं तर दुसऱ्या बँकेत बचत खाती असतात.

हल्ली प्रत्येकांचंच बँकेत दोन पेक्षा जास्त अकाऊंट असतात. असं अनेकदा होतं की, आधीचं एक अकाऊंट आहे तरीही पण गरज नसताना देखील काही लोक अजून एक अकाऊंट उघडतात. आज आम्ही तुम्हाला एकापेक्षा जास्त अकाऊंट असल्याने काय नुकसान होतं ते सांगणार आहोत... सेव्हिंग अकाऊंटमध्ये बँकेत किमान रक्कम असणं आवश्यक असतं. जर तुमच्या खात्यात किमान रक्कम नसेल तर बँक तुम्हाला दंड आकारते. अनेक खाजगी बँकेत १० हजार रुपयांची रक्कम ठेवणे आवश्यक असते. त्याच बँकेत दोन खाती असतील तर तुमची रक्कम दुप्पट होते. सर्वसामान्य माणसाला २० हजार रुपये भरणं अवघड होतं. दोन अकाऊंट असतील तर इनकम टॅक्स भरताना अडचणी येऊ शकतात. त्याचबरोबर इनकम टॅक्स भरताना सर्व बँक खात्यांशी संबंधित माहिती ठेवणे आवश्यक आहे. बऱ्याचवेळा त्यांच्या स्टेटमेंटचा रेकॉर्ड ठेवणं कठीण काम असतं.

अनेक अकाऊंट असल्यास वार्षिक देखरेख फी आणि सर्विस चार्जेस घेण्यात येतात. क्रेडिट आणि डेबिट कार्ड व्यतिरिक्त इतर सुविधांसाठी पण पैसे घेतले जातात. त्यामुळे तुमचं जास्त नुकसान होतं. एकापेक्षा जास्त बँकामध्ये खाते असल्याने तुम्हाला व्याज कमी मिळते आणि त्यामुळे नुकसान सहन करावं लागतं. एकापेक्षा जास्त बँकेत अकाऊंट असण्यापेक्षा एका चांगल्या योजनेमध्ये तुमचे पैसे गुंतवणे फायदेशीर ठरणार आहे. यामुळे तुम्हाला वार्षिक रिटर्न म्हणून अधिक व्याज मिळेल.

Trending Now