उन्हाळ्यात कशी काळजी घ्याल?

मार्चमध्येच तापमान चाळीशी गाठतंय, तर पुढचे महिने कसे असतील याची काळजी सगळ्यांना लागलीय. म्हणून उन्हाळ्यात प्रत्येकानं आपापली काळजी कशी घ्यायची, याच्या काही टीप्स

Sonali Deshpande
27 मार्च : सगळ्या महाराष्ट्रात वैशाख वणवा सुरू आहे. मार्चमध्येच तापमान चाळीशी गाठतंय, तर पुढचे महिने कसे असतील याची काळजी सगळ्यांना लागलीय. म्हणून उन्हाळ्यात प्रत्येकानं आपापली काळजी कशी घ्यायची, याच्या काही टीप्स- दुपारी 12 ते 3 यावेळेत उन्हात फिरू नका- चहा, कॉफी आणि सॉफ्ट ड्रिंक्स, दारू पिऊ नका

- तहान नसल्यासही पुरेसे पाणी प्या- प्रवास करताना सोबत पाणी घ्या- ओआरएस, घरची लस्सी, लिंबू पाणी, ताक इत्यादी पेय प्या- उच्च प्रथिनयुक्त आहार आणि शिळे अन्न खाऊ नका- उन्हात जाताना गॉगल, छत्री, टोपीचा वापर करा- सौम्य रंगाचे, सैल आणि सुती कपडे वापरा- पडदे, झडपा, सनशेड बसवा आणि रात्री खिडक्या उघड्या ठेवा - पार्किंग केलेल्या वाहनांमध्ये मुलं, पाळीव प्राण्यांना सोडू नका- अशक्तपणा जाणवल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या- जनावरांना सावलीत ठेवा आणि पुरेसं पाणी द्या

Trending Now