होळी खेळल्यावर रंग काढण्यासाठी काय कराल?

अंगावरचे हे रंग काढण्यासाठी काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे.

Sonali Deshpande | News18 Lokmat
01 मार्च : होळी आणि त्यानंतर येणारी धूळवड म्हणजे रंगांचा जल्लोष. हल्ली शक्यतो नैसर्गिक रंगांनीच होळी खेळली जाते. पण तरीही अंगावरचे हे रंग काढण्यासाठी काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे.- होळी खेळण्याआधी केसाला तेल लावून निघा. त्यानं केसांचं रंगांपासून रक्षण होऊ शकतं.- चेहऱ्यावर माॅस्चराईझिंग क्रीम लावा.त्यानं रंगांचा परिणाम होत नाही.

- रंग काढण्यासाठी समुद्र मीठाचा वापर करावा. मीठ खोबरेल तेलात घालून तेल अंगाला, चेहऱ्याला लावा.- होळी खेळून झाल्यावर आंघोळ करताना पाण्यात बदामाचं तेल, गुलाबाच्या पाकळ्या, उकळलेलं दूध टाका. त्यानं शरीरावरचा पक्का रंग निघून जाईल. त्वचाही मुलायम राहील.

Trending Now