वजन वाढवायचंय? हे उपाय करून पहा

आपलं वजन वाढावं, शरीरात उर्जा राहावी यासाठी घरच्या घरीच अनेक पदार्थ उपलब्ध असतात.

Sonali Deshpande
10 एप्रिल : नेहमी आपण वजन कसं कमी करायचं याच्या टीप्स पाहत असतो. पण बारीक व्यक्तींना आपलं वजन कसं वाढवायचं याची नेहमी काळजी असते. आपलं वजन वाढावं, शरीरात उर्जा राहावी यासाठी घरच्या घरीच अनेक पदार्थ उपलब्ध असतात.1. बदाम : शरीरासाठी उपयुक्त. बदामाच्या सेवनानं शरीर संतुलित राहतं. शरीरात उर्जा निर्माण होते. उत्साह येतो.

2. केळं : कृश व्यक्तीसाठी केळं अत्यंत उपयोगी. केळं आणि दूध एकत्र घेतलंत की वजन वाढतं. शिवाय केळ्यानं पचनशक्ती चांगली होते.3. नारळाचं दूध : यानं शरीरातल्या कॅलरीज वाढतात. नारळाच्या दुधानं जेवण चविष्ट होतंच. शिवाय वजनही वाढतं.4. अंडं : बारीक व्यक्तींनी रोज जेवणात अंडं हवं. अंड्यात ए, डी आणि मॅग्निशियम, सोडियम, पोटेशियम असतं. वजन वाढायला अंड्याचा पर्याय उत्तम.5. पनीर : मांसाहार न करणाऱ्यांनी पनीर नक्की खावं. त्यानं शरीरातल्या कॅलरीज वाढतात. वजनही वाढतं.6. ब्राऊन राईस : यात कार्बोहायर्डेड असतं. फायबरही असतं. यामुळे वजन वाढतं आणि शरीर तंदुरुस्त राहतं.कृश व्यक्तींना प्रमाणात वजन वाढण्यासाठी हे पदार्थ उपयोगी आहेत.

Trending Now