सतत आनंदी राहचंय... तणाव मुक्त राहायचंय... तर एकदा हे उपाय कराच

अनेकदा करिअर घडवण्यासाठी आपण स्वतःला विसरुन फक्त धावत असतो

अनेकदा करिअर घडवण्यासाठी आपण स्वतःला विसरुन धावत असतो. याचा पहिला परिणाम शरिरावरील कोणत्या भागावर जाणवत असेल तर तो त्वचेवर असतो. व्यक्तीची त्वचा फार निस्तेज वाटायला लागते. तसेच फिटनेसवरही त्याच्या परिणाम होतो. आज आम्ही तुम्हाला तणावमुक्त होण्याचे असे काही उपाय सांगणार आहोत जे सोप्पे तर आहेतच शिवाय शरीरासाठीही सर्वोत्तम आहेत. या उपायांनी तुमचा तणाव कमी होईल आणि तुम्ही आनंदी राहाल.सर्वातआधी तर तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण काय आहे हे ठरवा. आयुष्यात जगण्यासाठी फक्त करिअरच नसतं तर आपल्या अवती- भोवती असणारी माणसंही महत्त्वाची असतात. यशस्वी होण्याच्या शर्यतीत तुम्ही तुमच्या जवळच्या माणसांपासून दूर तर नाही जात ना याचा नक्की विचार करा. आपल्या माणसांना वेळ द्यायला विसरू नका. त्यांच्यासोबत वेळात वेळ काढून एखादी ट्रिप प्लॅन करा.व्यायाम करणं फक्त शरीरासाठीच फायदेशीर असतं असं नाही तर व्यायामामुळे तणाव कमी व्हायलाही फार मदत होते. रोज सकाळी उठून व्यायाम करायला विसरू नका. दररोज जीमला जाणं शक्य नसेल तर घरातल्या घरात व्यायाम करायला प्राधान्य द्या.

मित्र- मैत्रिणींसोबत वेळ घालवा. मैत्रीमुळे खडतर आयुष्यही सुकर व्हायला मदत होते. मित्रांसोबत आपली चिंता व्यक्त केल्याने मनाला थोडी शांतता मिळते. तसेच त्या कठीण परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठीही मित्र मदत करु शकतात. पण फक्त आपलीच गोष्ट त्यांना सांगू नका. त्यांची गोष्ट ऐकण्यासाठीही त्यांना वेळ द्या.नोकरी ही जगण्यासाठी आवश्यक असते. पण छंद तुम्हाला जगायला शिकवतात. वाचन, गायन, नाच, भटकंती यांसारख्या तुमच्या आवडी- निवडी ठरवून त्या जपायला शिका. आपल्या व्यग्र कारभारातूनही तुम्ही या छंदांना योग्य तो वेळ द्या. आपलं आवडीचं काम करताना आपण तणावमुक्त असतो.

Trending Now