उकळता चहा पिताय? सावधान...

नुकत्याच एका रिसर्चमधून असं पुढे आलंय की, उकळता चहा पिणाऱ्यांना अन्ननलिकेचा कॅन्सर होण्याची शक्यता असते.

Sonali Deshpande
06 फेब्रुवारी: गरमागरम चहा कुणाला आवडत नाही? पण तो किती गरम प्यायचा याला काही मर्यादा आहेत.कारण नुकत्याच एका रिसर्चमधून असं पुढे आलंय की, उकळता चहा पिणाऱ्यांना अन्ननलिकेचा कॅन्सर होण्याची शक्यता असते.दारू आणि सिगारेटमुळे कॅन्सर होतो, हे तर सगळ्यांना माहीत आहे. त्यात आता भर याची पडलीय. असंही म्हटलं जातंय की दारू, सिगरेट ओढणाऱ्यांनी गरम चहा प्यायला तर कॅन्सर होण्याची शक्यता जास्त असते.चीनच्या नॅचरल सायन्स फाऊंडेशननं आपल्या रिसर्चमध्ये हे सांगितलंय. त्यांनी दोन ग्रुप्स बनवले. एक ग्रुप कोमट चहा आणि 15 ग्रॅम दारूचं सेवन करायचा. तर दुसरा ग्रुप गरम चहा आणि 15 ग्रॅम दारू घ्यायचा. तर पहिल्या ग्रुपमध्ये कॅन्सर होण्याची शक्यता बळावली.अन्ननलिकेचा कॅन्सर घातक असतो. त्यातून वाचण्याची शक्यता कमी असते. इंटरनॅशनल जर्नल ऑफ अॅडव्हान्स मेडिकल अँड हेल्थ रिसर्चच्या म्हणण्याप्रमाणे भारतात अन्ननलिकेच्या कॅन्सरनं मरण्याचं प्रमाण जास्त आहे.

चहा प्यायला काहीच हरकत नाही, पण तो उकळता न पिण्याची काळजी घ्यायला हवी.

Trending Now